Worli Hit And Run Case Saam Tv
मुंबई/पुणे

Worli Hit And Run Case: वरळी 'हिट अँड रन' प्रकरणात कुटुंब गजाआड ; मुलांच्या चुकीनं कुटुंबाला घडेल जेलवारी

Worli Hit And Run Case : पुण्यातील पोर्शे अपघातप्रकरण असो वा वरळीतील BMW अपघात प्रकरण, दोन्ही घटनांमधून एकच गोष्ट अधोरेखित होतीय ती म्हणजे मुलांच्या चुकीची शिक्षा संपूर्ण कुटुंबालाच भोगावी लागते.

Tanmay Tillu

वरळीतल्या प्रकरणानंतर मिहीरसह त्याची आई, बहीण आणि वडिलांनाही जेलवारी करावी लागली. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे. पुण्यातील कल्याणीनगर प्रकरणावर पडदा पडत नाही तोच मुंबईतील वरळी हिट अँड रन प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र हादरला. महिलेला आपल्या महागड्या गाडीनं एकदा नाहीतर दोनदा चिरडणाऱ्या मिहीर शाहाला बेड्या घालण्यात अखेर पोलिसांना यश आलं.

तब्बल तीन दिवसांनी पोलीस आरोपी मिहीर शाहपर्यंत पोहोचलंय. मात्र मिहीरच्या या कारनाम्यामुळे अख्ख्या कुटुंबाला जेलवारी घडलीये. त्यामुळे पालकांनो मुलांवर लक्ष ठेवा नाहीतर त्यांच्या चुकीची शिक्षा तुम्हाला भोगावी लागेल.

एक अपघात, कुटुंब गजाआड

मिहीर शाह,मुख्य आरोपी, पोलिसांकडून अटक

राजेश शाह, आरोपी मिहीरचे वडील, वरळी पोलिसांकडून अटक,जामीन

मिनी राजेश शाह,आरोपीची आई, पोलिसांकडून चौकशी,चौकशीअंती सुटका

पूजा राजेश शाह,आरोपीची बहीण, पोलिसांकडून चौकशी,चौकशीअंती सुटका

किंजल राजेश शाह,आरोपीची दुसरी बहीण,पोलिसांकडून चौकशी,चौकशीअंती सुटका

पुण्यातील कल्याणीनगर परिसरात घडलेल्या हिट अँड रन प्रकरणानं अख्खा महाराष्ट्र हादरला. या अपघात प्रकरणी अख्ख्या कुटुंबाला जेलवारी घडली. त्याचीच पुनरावृत्ती मुंबईच्या वरळी हिट अँड रन प्रकरणात घडतेय. ऐन अधिवेशन काळात घडलेल्या याप्रकरणाचे पडसाद विधिमंडळातही उमटलेत. दरम्यान मिहीर शाहला पोलिसांनी कोर्टात हजर केलं असता धक्कादायक खुलासे झालेत. काय घडलं कोर्टात पाहूय

वरळी पोलिसांची कोर्टात काय सांगितलं?

वरळी पोलिसांची शिवडी कोर्टात माहिती

मिहीरनं दाढी, केस गाडीमध्येच कापले

वरळी पोलिसांकडून आरोपी मिहीरच्या पोलिस कोठडीची मागणी

मिहीर शाहनं अपघात झाल्यानंतर आपल्या कुटुंबाला सर्व माहिती दिली

मिहीरनं सरेंडर केलं नाही, त्याला अटक केली

आरोपी मिहीरनं लपण्यासाठी वेगवेगळ्या जागा बदल्या

आरोपी मिहीरनं अनेकांना मदतीसाठी फोन केले

वरळी हिट अँड रन प्रकरणात 1,735 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. याबाबत सरकारी वकील आणि आरोपी मिहीर शाहच्या वकीलांमध्ये जोरदार युक्तीवाद झाले. सरकारी वकिलांनी मिहीरच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती ती कोर्टानं मान्य करत 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीये.

पालकांनो तुमच्या मुलांना महागड्या गाड्या गिफ्ट करताना विचार करा. कारण तुम्ही दिलेलं गिफ्ट तुमच्या कुटुंबालाच जेलवारी घडवण्यासाठी कारणीभूत ठरु शकतं. निष्पापांचा बळी घेणारा मिहीर असो वा पुण्यातील अल्पवयीन आरोपी दोघेही तितकेच दोषी आहेत मात्र त्यांचे पालकही या दोन्ही घटनेत तितकेच दोषी आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sevai Kheer Recipe : सणासुदीला खास बनवा शेवयांची खीर, एक घास खाताच मन होईल तृप्त

Maharashtra Live News Update: पुण्यातील देविका हाइट्स इमारतीच्या टेरेसवरील टॉवर केबिनला आग

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

SCROLL FOR NEXT