shiladevi thakur, vasai news saam tv
मुंबई/पुणे

Vasai News : तानसा खाडीत महिला बुडाली, अग्निशमन दलाच्या मदतीने शोधकार्य सुरु

अग्निशमन दलाच्या मदतीने शोधकार्य सुरू केले आहे अशी माहिती मांडवी पोलिसांनी दिली आहे.

चेतन इंगळे

Vasai News : वसई तालुक्यातील खानिवडे येथील तानसा खाडीत पाय घसरून महिला बुडल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली असून महिलेचा अद्याप शाेध सुरु आहे. (Maharashtra News)

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार शुक्रवारी संध्याकाळी सुमारे साडेचारच्या सुमारास शिलादेवी रवींद्र ठाकूर (४०) ही महिला आपल्या दोन मुलींसह हेदवडे येथे फेरफटका मारण्यासाठी गेली होती. या रस्त्याच्या बाजूलाच तानसा खाडी आहे.

तेथील खाडीच्या किनाऱ्यावर ती उतरली होती. त्यावेळी तिचा पाय घसरून पाण्यात पडली. यावेळी खाडीला आलेल्या मोठ्या भारतीच्या प्रवाहात वाहून गेली आहे. या घटनेची माहिती मांडवी पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल होऊन अग्निशमन दलाच्या मदतीने शोधकार्य सुरू केले आहे अशी माहिती मांडवी पोलिसांनी दिली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Case: अपात्र होणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री कसं बनवलं? ठाकरे गटाचा थेट सवाल

Maharashtra News Live Update: आरएसएस अदानींचे नोकर आहेत - राहुल गांधी

श्रावणात हिरव्या बांगड्या घालण्याचे महत्त्व काय? जाणून घ्या शरीराला होणारे 5 फायदे

माजी मंत्र्याची पक्षातून हकालपट्टी; पक्षप्रमुखांची मोठी कारवाई; इतर नेत्यांमध्ये खळबळ

Homeguard Drivers: होमगार्ड्सच्या हाती पोलीस वाहनांचं स्टेरिंग; २,३०० होमगार्डना दिलं जाणार वाहनचालकाचं प्रशिक्षण

SCROLL FOR NEXT