Dhananjay Munde Saam TV
मुंबई/पुणे

धनंजय मुंडेना महिलेची धमकी; ५ कोटी न दिल्यास बलात्काराची तक्रार

आरोपी महिलेने धनंजय मुंडे यांच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार देखील केली होती.

सुरज सावंत

मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना बलात्काराची तक्रार करण्याची धमकी देत, एका महिलेने ५ कोटीची खंडणी मागितल्याची घटना समोर आली आहे. या धमकी प्रकरणी मुंबईच्या पोलीस (Mumbai Police) ठाण्यात इंदौरच्या महिले विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबधित गुन्हा पुढील तपासासाठी गुन्हे शाखेकडे वर्ग केला असून आरोपी महिलेने धनंजय मुंडे यांच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार देखील केली होती. कालांतराने महिलेने मुंडेविरोधातील तक्रार मागे घेतली होती.

हे देखील पाहा -

दरम्यान, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात आंतरराष्ट्रीय नंबरवरुन या महिलेने मुंडे यांना फोन करत ५ कोटी रुपये किंमतीचे दुकान व महागड्या मोबाइलसाठा तगादा लावला होता. तसंच जर मागण्या पूर्ण न केल्यास सोशल मिडियावर (Social Media) बदनामी करण्याची धमकी देत, पून्हा गुन्हा दाखल करण्याची धमकीही महिलेने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलिस अधिक तपास करत आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: गणेशोत्सवात पुण्यात ७००० पोलिस तैनात, एआय कॅमेऱ्याची असणार नजर; २७ ऑगस्ट अन् ६ सप्टेंबर 'ड्राय डे' घोषित

Atharva Sudame: पुरोगामी महाराष्ट्राची सामाजिक अधोगती

Liquor License Controversy: मद्यविक्रीत नेत्यांचेच दारूचे अड्डे काठोकाठ? परवाने पुढाऱ्यांच्या निकटवर्तीयांच्या घरांत?

WhatsApp Scam: व्हॉट्सअ‍ॅपवर तुमची 'ही' एक चूक पडेल महागात, रिकामं होईल बँक अकाउंट

Maharashtra Live News Update: मीराबाई चानूने पटकावलं सुवर्णपदक

SCROLL FOR NEXT