Mumbai railway crime update saam tv
मुंबई/पुणे

धक्कादायक! मुंबईत महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, लोकल ट्रेनमध्ये घुसून महिलेचा विनयभंग

जोगेश्वरी रेल्वे स्थानकात एक धक्कादायक घटना घडल्यामुळं खळबळ उडाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : जोगेश्वरी रेल्वे स्थानकात एक धक्कादायक घटना घडल्यामुळं खळबळ उडाली आहे. जोगेश्वरी रेल्वे स्थानकाच्या हार्बर मार्गावर ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या (woman molested) महिलेचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित महिलेनं याप्रकरणी अंधेरी व बोरिवली रेल्वे पोलिसांकडे (Railway Police) तक्रार नोंदवली आहे. त्यानंतर बोरीवली रेल्वे पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी चार पथक बनवले आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरु आहे. (woman molested in jogeshwari railway station)

बोरीवली रेल्वे स्थानकात काही दिवसांपूर्वी ट्रेनमध्ये प्रवास करताना एका व्यक्तीने विनयभंग केला होता. ही घटान ताजी असतानाच आता पुन्हा एकदा जोगेश्वरी रेल्वे स्थानकात अशीच धक्कादायक घटना घडल्यानं खळबळ उडाली आहे. जोगेश्वरी रेल्वे स्थानकात घडलेल्या घटनेबाबत रेल्वे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी रेल्वे स्टेशनवर त्याचे कपडे काढून अर्धनग्न अवस्थेत फिरत असल्याचे सीसीटीव्हीच्या माध्यमातून समोर आलं आहे.

हा आरोपी मनोरुग्ण असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याला अटक केल्यानंतर या घटनेबाबत अधिक माहिती मिळेल. भविष्यात महिला बोगीत पुरुषाने प्रवेश केल्यास १५१२ या नंबरवर कॉल करून पोलिसांना माहिती द्यावी, असं आवाहन रेल्वे पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बोगस बियाण्यानंतर बोगस खतांचा साठा जप्त; राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच

पुरातून हत्तीने वाचवलं वाघाला? पाठीवर बसवून हत्तीने केली सुटका?

Bihar Politics: राज्यातील भाजपचं सरकार कोसळणार? नितीश कुमारांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

राममंदिरातील चोरीचा पैसा शेअर बाजारात? पोलिसांनी 30 बँक खाती गोठवली?

तुम्ही पिताय भेसळयुक्त दूध? महाराष्ट्रात भेसळमाफियांचा उच्छाद, भेसळमाफियांना होणार थेट मृत्यूदंडाची शिक्षा?

SCROLL FOR NEXT