Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : दुसरा जन्मच मिळाला! जवानाच्या कर्तव्यदक्षतेमुळे ‘ती’ मृत्यूच्या दारातून परतली

हृदयाचा ठोका चुकविणारे दृश्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन जाधव

Pune News : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वानाच्या कर्तव्यदक्षतेमुळे एका महिलेला दुसरा जन्म मिळाल आहे. मुलगी आणि पतीसमवेत महिला प्रगती एक्स्प्रेसने मुंबईला निघाली होती. फलाटावर पोहोचताच गाडी सुरू झाली होती. त्यामुळे घाईगडबडीत ही महिला गाडीत चढण्याचा प्रयत्न करीत होती. त्यातवेळ तिचा पाय घसरला आणि ती थेट फलाट आणि गाडीच्या डब्यामध्ये अडकली.

हृदयाचा ठोका चुकविणारे हे दृश्य अनेकांनी पाहिले. त्यातून रेल्वे सुरक्षा दलाचा एक जवान पुढे आला. त्याने तत्परता दाखवित तिला लोहमार्गावर पडण्यापूर्वीच वर ओढले आणि मृत्यूच्या दारातून परत आणलं.

राजलक्ष्मी नायरअसे या महिलेचे नाव आहे. या घटनेतच या महिलेच्या जखमी झाली असून तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्रगती एक्सप्रेसने नायर या मुलगी आणि पतीसोबत मुंबईला निघाल्या होत्या. त्यांना फलाटावर पोहोचण्यास उशीर झाला त्यावेळी गाडी सुरू झाली होती आणि हळूहळू वेग धरत होती. नायर, त्यांची मुलगी आणि पती हे धावत आले. ते चालत्या रेल्वेमध्ये बसू लागले.

नायर यांनी पहिल्यांदा त्यांच्या मुलीला गाडीत बसविले. त्यानंतर त्या बसू लागल्या, मात्र त्यांचा पाय घसरला आणि त्या थेट रेल्वे आणि फलाटाच्या दरम्यान अडकल्या. ही घटना फलाटावरील अनेकांसह त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेले रेल्वे सरक्षा दलाचे जवान विनोदकुमार मीना यांनीही पाहिली. त्यांनी तत्काळ धाव घेत नायर यांना ओढून बाहेर काढले. त्यात त्यांना काही प्रवाशांनीही मदत केली त्यामुळे या महिलेचा जीव वाचला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : राहुल गांधी सुप्रीम कोर्टातून बाहेर पडले

Maharashtra News Live Update: सोमेश्वरच्या निकालात सुनेत्रा पवारांचे वर्चस्व; सातही निकाल त्यांच्या बाजूने

Late night sleeping: रात्री झोपण्याची योग्य वेळ कोणती? रात्री जागणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे

देशातील हा दुसरा स्वातंत्र्य लढा; महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी असं का म्हणाले?

Nagpur Fort : नागपूरजवळ लपलाय ३०० वर्षांचा ऐतिहासिक वारसा, कैद्यांसाठी तुरुंग बनलेला विदर्भातील 'हा' किल्ला पाहिलात का?

SCROLL FOR NEXT