Cyber Crime
Cyber Crime Saam TV
मुंबई/पुणे

हॉटेलची फ्रॅंचाईजी घेणं महिलेला पडलं महागात; सायबर चोरट्यांकडून तब्बल ७९ लाखांची फसवणूक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन जाधव -

पुणे: पुण्यात एका महिलेची प्रसिद्ध हॉटेल 'केएफसी'ची फ्रॅंचाईजी काढून देतो असं सांगत तब्बल ७९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सध्याच्या डिजिटल युगात आपली फसवणूक होवू शकते यासाठी खबरदारी घेण्याचं आवाहन सायबर पोलिसांकडून (Cyber Police) सतत करण्यात येत. तशी खबरदारी आपण घेतो देखील मात्र, खबरदारी घेऊनही चोरट्यांनी जर एखादी खरीखुरी वाटावी अशी वेबसाईट काढली तर कोणीही फसू शकतं.

असाच एक प्रकार पुण्यात घडला आहे. फसवणूक करणारे चोरटे एवढे हुशार होते की, त्यांनी महिलेला हॉटेल 'केफसी'ची फ्रॅंचाईजी काढून देतो असं सांगितलं एवढेच नव्हे तर त्यांनी यासाठी केएफसी कंपनीची खोटी कागदपत्र तयार करत खोटी वेबसाईट (Website) देखील बनवली होती. त्यामुळे महिलेने त्यांच्यावरती विश्वास ठेवला.

पाहा व्हिडीओ -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला तक्रारदार ही इस्टेट एजंट असून गेल्या काही दिवसांपासून पैशाची गुंतवणूक करण्यासाठी एखादी कंपनी शोधत होती. अशातच गौरव निकम, राहुल शिंदे आणि राहुल मॅथ्यू असे नाव सांगून चोरट्यांची त्या महिलेची ओळख झाली. या तिघांनी त्या महिलेला केएफसी हॉटेलची फ्रेंचाईजी देतो अशी बतावणी केली.

दरम्यान, सायबर चोरट्यांनी त्या महिलेला चार वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये तब्बल ७९ लाख ७६ हजार रुपये ऑनलाइन स्वरूपात पाठवण्यास सांगितले. एखाद्या मोठ्या हॉटेलची फ्रेंचाईजी मिळते आहे असं वाटल्याने त्या महिलेने त्यांना रक्कमही पाठवली. हा सर्व प्रकार मागील तीन महिन्यांपासून सुरू होता.

सायबर चोरटे इतके हुशार होते की त्यांनी 'केएफसी'ची खोटी वेबसाईट देखील बनवली, तर महिलेने पैसे पाठवल्यानंतर सायबर चोरट्यांनी महिलेचा फोन उचलला नाही. शिवाय कोणत्याही ई-मेलला (E-mail) उत्तर दिले नाही.

त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचं महिलेच्या लक्षात आलं आणि त्यांनी थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या फसवणूकीबाबतचा गुन्हा नोंद करुन घेतला आहे. तर अशा मोठ्या रकमेची गुंतवणूक करताना योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन देखील पोलिसांनी केलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amrita Pandey: प्रसिद्ध अभिनेत्री फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली; मृत्यूच्या काही तास आधीचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस व्हायरल

Johnny Lever: कोण आहे आमिर खान? मुलाखतीदरम्यान जॉनी लीव्हर काय म्हणाला? VIDEO

KKR vs DC: इडन गार्डनवर दिल्लीचा दारूण पराभव; कोलकाताचा ६वा विजय

Maharashtra Election:'..त्यांचा सत्यानाश होणार'; अकलूजमधून फडणवीसांचा मोहिते-पाटलांना इशारा

3.99 लाख रुपये किंमत, 25km मायलेज; सीएनजी आणि इलेक्ट्रिकपेक्षा बहजत 'या' कारला आहे मागणी

SCROLL FOR NEXT