PMP Bus
PMP Bus Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Accident News: बसच्या चाकामध्ये पाय अडकून महिलेचा मृत्यू, पुण्यामधील धक्कादायक घटना

Rohini Gudaghe

अक्षय बडवे साम टीव्ही, पुणे

पीएमपी बसच्या चाकामध्ये (Pune News) पाय अडकून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील दांडेकर पुलाजवळील ही दुर्दैवी घटना घडली आहे. पीएमपी बसमध्ये (PMP Bus) चढत असताना चाकामध्ये पाय अडकून गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. काशीबाई खुंरगळे असं मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव आहे.

याप्रकरणी त्यांचा मुलगा मल्हारी पांडुरंग खुरंगळे यांनी पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. या घटनेवरून पीएमपी बसचालक दिलीपराव वामनराव लहाने यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला (Woman Died After Leg Stuck In PMP Bus)आहे. पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत. १७ एप्रिल रोजी ही घटना समोर आली आहे. ही घटना सिंहगड रस्त्यावरील दांडेकर पुलाजवळील पेट्रोल पंपासमोर घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला सोमवारी दुपारी पीएमपी बसमध्ये पाठीमागील दरवाजातून चढत होती. परंतु त्यावेळी बसचालकाने निष्काळजीपणे बस चालवली. त्यामुळे महिलेचा डावा पाय बसच्या चाकामध्ये अडकला (Woman Died) होता. त्यामुळे ही महिला गंभीर जखमी झाली होती. त्यामळे या महिलेला रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान सुरू असलेल्या उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस रस्ते अपघातांचं प्रमाण देखील वाढलेलं आहे. वाहनांचा भरधाव वेग हे रस्ते अपघाताचं प्रमुख कारण आहे. रस्ते अपघातात आजवर अनेकांनी जीव गमावले आहेत.

बसमध्ये चढताना प्रवाशांनी काळजी घेणं गरजेचं आहे. विशेष म्हणजे बसमध्ये चढताना प्रवाशांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. बसच्या चाकात पाय अडकून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यामध्ये घडली आहे. अनेकदा बसमध्ये चढताना अपघात घडल्याच्या घटना आपण ऐकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: विमानाच्या धडकेत ३० पेक्षा जास्त फ्लेमिंगोचा मृत्यू, मुंबईतल्या घाटकोपरमधील घटना

Health Tips: नखांवर पांढऱ्या रंगाचे ठिपके का येतात?

Health Tips: जेवल्यानंतर लगेचच आंघोळ का करू नये, कारण वाचा

Pune Car Accident: मुलगा बेदरकार, बाप जबाबदार! वडिलांनीच कार दिल्याची मुलाची कबुली; बापाला अटक, पबलाही टाळं

Mumbai Metro: मालाड स्थानकाचं नाव बदललं, आता 'मोतीलाल ओसवाल मालाड'च्या नावाने ओळखले जाणार हे मेट्रो स्थानक

SCROLL FOR NEXT