Mumbai woman BMW driver tries to hit traffic police officer saam tv
मुंबई/पुणे

आधी पोलिसाला धमकी, नंतर अंगावर BMW घालण्याचा प्रयत्न; महिलेची मुजोरी

Mumbai Woman BMW Driver Tries To Hit Traffic Police Officer: मुंबईतील विलेपार्ले पश्चिम येथे महिला BMW चालकाने वाहतूक पोलिसाच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. पोलिसाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून महिला आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

Omkar Sonawane

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई: वाहतूक नियमनाचे कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर BMW कार घालण्याचा प्रयत्न करून त्यांना खोट्या प्रकरणात अडकविण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार विलेपार्ले पश्चिम येथे घडला आहे. या प्रकरणी महिला कारचालकाविरुद्ध जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, महिला आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. तिच्याविरोधात अटकेची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही घटना 30 ऑक्टोबर रोजी रात्री 8.15 ते 8.30 च्या दरम्यान संगीत महाभारती जंक्शन, प्रतीक्षा बंगल्यासमोर, एन. एस. रोड क्रमांक 10, विलेपार्ले पश्चिम येथे घडली. सांताक्रुझ वाहतूक विभागाचे पोलीस शिपाई प्रशांत गोकुळ हाके हे त्यावेळी गणवेशात वाहतूक नियमनाचे कर्तव्य बजावत होते.

दरम्यान, BMW कार आणि मारुती वॅगनआर यांच्यात किरकोळ अपघात झाला होता. त्यामुळे दोन्ही वाहने रस्त्याच्या मध्यभागी उभी राहिल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. हा अडथळा दूर करण्यासाठी पोलीस शिपाई हाके यांनी दोन्ही वाहनचालकांना वाहने रस्त्याच्या बाजूला घेण्यास सांगितले. मात्र, BMW कार चालवणाऱ्या महिला चालकाने पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत त्यांच्याशी हुज्जत घातली. तसेच खोट्या प्रकरणात अडकविण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. पोलीस शिपाई गणवेशात कारसमोर उभे असतानाही महिला चालकाने कार थांबविण्याऐवजी तिचा वेग वाढवून पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. वारंवार कार थांबविण्यास सांगूनही महिला चालकाने कार पुढे नेल्याने स्वतःचा बचाव करण्यासाठी हाके यांना बाजूला व्हावे लागले.

त्यानंतर महिला चालकाने भरधाव आणि बेदरकारपणे कार चालवत जे. व्ही. पी. डी. जंक्शनच्या दिशेने घटनास्थळावरून पलायन केले. या घटनेत मारुती वॅगनआर कारचेही नुकसान झाले. या प्रकरणी पोलीस शिपाई प्रशांत गोकुळ हाके यांच्या तक्रारीवरून जुहू पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 132, 125, 351(2) आणि मोटार वाहन कायदा कलम 184 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास जुहू पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बाजारात भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना टोमॅटो रस्त्यावर फेकण्याची वेळ

IMD Weather Alert: सावधान! परत आणखी एक चक्रीवादळ येतंय; 'या' राज्यांमध्ये होणार मुसळधार पाऊस

Jio Recharge: स्वस्तात मस्त! Jio चा भन्नाट रिचार्ज, फक्त १४७ रुपयांत मिळवा भरपूर फायदे

पुणेकरांनो, पाणी जपून वापरा! दिवाळीनंतर दोन दिवस पाणीकपात?

CM Omar Abdullah Wedding: 56 व्या वर्षी मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्यांदा बांधली लगीनगाठ; कोण आहे CMची पत्नी?

SCROLL FOR NEXT