पुणे: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने राज्यामध्ये दिवसाला मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत असताना शाळा (School) बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने (State Government) घेतला होता. शाळा परत एकदा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad ) यांनी यावेळी दिली आहे. राज्यामध्ये २४ जानेवारीपासून १ ली ते १२ वी पर्यंतच्या शाळा सुरू होणार, असे त्यांनी यावेळी सांगितले आहे. पण पुण्यामध्ये (Pune) कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे.
हे देखील पहा-
आज देखील ७ हजाराहून देखील अधिक कोरोनाबाधित (Corona) आढळून आले आहेत. यामुळे पुण्यातील शाळा २४ जानेवारी सोमवारपासून सुरु होणार कि नाही. याविषयी एका प्रसारमाध्यमांशी बोलताना पुण्याचे महापौर (Mayor) मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी महत्वाची माहिती दिली आहे. महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले की, राज्यामध्ये सोमवारपासून शाळा सुरु होत आहेत. पण पुण्यात शाळा सुरु करण्याविषयी अजून ठोस निर्णय झालेला नाही. दिवसेंदिवस पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.
यामुळे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबरोबर शनिवारी होणाऱ्या कोरोना आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात येणार आहे. अद्याप तरी देखील शहरातील शाळा सुरु करण्याविषयी निर्णय झालेला नाही. वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यात सरकारने १५ फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. आता २४ जानेवारीपासून परत एकदा शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
मात्र, स्थानिक प्रशासनाला (administration) त्याचे अधिकार देखील देण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी (CM) शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यामुळे सोमवारपासून राज्यात परत एकदा शाळेची घंटा वाजणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी यावेळी म्हटले आहे. पुण्यामध्ये जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे.
दिवसाला २०० ते ५०० असे आढळणारे रुग्ण आता हजारांच्या घरात येऊन पोहोचले आहेत. मागील २ दिवसापासून हा आकडा ५ हजारांपेक्षा जास्त आहे. तर आज पुणे शहरात कोरोना रुग्णसंख्येने २ वर्षातील आजवरचा उचांक गाठला आहे. गुरुवारी शहरात तब्बल ७ हजार २६४ रुग्ण आढळून आले आहेत. पुणेकरांसाठी हि खूप चिंतेची बाब ठरत आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.