Pune elections Uddhav Thackeray and Raj Thackeray saam tv
मुंबई/पुणे

महापालिका निवडणुकीआधी पुण्याच्या राजकारणात मोठा उलटफेर; मनसे आणि ठाकरे सेना...

Pune Politics : महापालिका निवडणुकीआधी पुण्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार आहे. मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेले ठाकरे बंधू पुणे महापालिका निवडणुकीसाठी एकत्र येण्याची शक्यता आहे.

Akshay Badve, Nandkumar Joshi

  • पुण्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ

  • महापालिका निवडणुकांआधीच वारे फिरले

  • ठाकरेंची शिवसेना-मनसे एकत्र लढण्याची शक्यता

अक्षय बडवे, पुणे | साम टीव्ही

मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेले ठाकरे बंधू महापालिका निवडणुकांमध्ये एकत्र येणार का, असा प्रश्न महाराष्ट्रातील मराठी माणसाला आणि ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना पडला आहे. याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळी चर्चा सुरू असतानाच अचानक पुण्याचं राजकीय वातावरण बदललं आहे. दोन्ही पक्षांकडून अद्याप अधिकृत माहिती दिली नसतानाच पुण्यात महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन प्रमुख पक्ष अनेक ठिकाणी वेगवेगळे लढले. परिणामी ही निवडणूक महायुतीभोवतीच फिरल्याचे चित्र होते. आगामी महापालिका निवडणुकीत किमान मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या महापालिकांमध्ये महायुती तुटल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्याचवेळी पुण्यात ठाकरेंची शिवसेना आणि मनसे महापालिका निवडणूक एकत्र लढणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पुणे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना-मनसे युती होण्याची शक्यता असून, उद्या, रविवारी दोन्ही पक्षांची एकत्र अनौपचारिक बैठक होणार असल्याचे समजते. सूत्रांनुसार, पुणे शहर शिवसेना भवन येथे दोन्ही पक्षांचे पदाधिकारी यांचा एकत्रित चहापानाचा कार्यक्रम होईल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुख्य पदाधिकारी आणि मनसेचे मुख्य पदाधिकारी हे यावेळी उपस्थित असतील.

भाजपमध्ये अहमहमिका, इच्छुकांच्या मुलाखती

पुणे महापालिका निवडणूक यावेळी प्रतिष्ठेची होणार आहे यात काही शंका नाही. त्याच दृष्टीने भाजपनं तयारीही केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मागील ४ दिवसांत दोन हजार इच्छुकांनी अर्ज घेतले आहेत. भाजप कार्यालयात आजपासून इच्छुकांच्या मुलाखतीही सुरू झाल्या आहेत. मुलाखतींनंतर सर्व नावं प्रदेशाध्यक्ष कार्यालयाकडं पाठवण्यात येतील. त्यानंतर तिकीटांचं वाटप होईल, असं सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Film Festival: ११ वा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव लवकरच सुरु; तारीख आली समोर

Maharashtra Live News Update: महाविकास आघाडीमधील पक्षाची पहिली बैठक सोमवारी

New Year Trip : मुंबई-पुणे मुंबई! न्यू इयर ट्रिप होईल खास, स्वस्तात मस्त ठिकाणांची यादी

Masala Sandwich Pav Recipe : स्ट्रीट स्टाइल झणझणीत मसाला सँडविच पाव, ऑफिसवरून आल्यावर १० मिनिटांत बनवा

Rava Burfi Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग घरच्या घरी झटपट बनवा टेस्टी रवा बर्फी, नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT