Sanjay Raut Latest News  Saam TV
मुंबई/पुणे

Sanjay Raut : संजय राऊतांचा जामीन रद्द होणार? ईडीच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी

आज ईडीने दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी होणार असून या सुनावणीकडे शिवसैनिकांचं लक्ष लागून आहे.

साम टिव्ही ब्युरो

Sanjay Raut Latest News : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत यांना तब्बल १०३ दिवसानंतर जामीन मिळाला. मात्र, पीएमएलए न्यायालयाने बुधवारी राऊत यांचा जामीन मंजूर केला. दरम्यान, संजय राऊतांना जामीन मिळातच, ईडीने मुंबई हायकोर्टात धाव घेतली. मात्र, वेळेअभावी हायकोर्टात सुनावणी झाली नाही. आज ईडीने दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी होणार असून या सुनावणीकडे शिवसैनिकांचं लक्ष लागून आहे.

संजय राऊत (Sanjay Raut) यांचा जामीन रद्द व्हावा अशा आशयाची याचिका ईडीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांना केलेली अटक ही बेकायदेशीर असल्याचं म्हणत कोर्टाने ईडीच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले

दिवाणी खटल्यासाठी ईडीने पीएमएलए कायदा लागू केला असल्याचे ताशेरे कोर्टाने ओढले आहेत. या प्रकरणात राकेश आणि सारंग वाधवान मुख्य आरोपी असताना त्यांना अटक करण्याऐवजी संजय राऊत आणि प्रविण राऊत यांना अटक करण्यात आली. यात ईडीच्या बाजूने आरोपी पिक अँड चूज केल्याचं दिसतंय, असं म्हणत कोर्टाने ईडीला खडेबोल सुनावले होते.

दरम्यान, या निकालाला हायकोर्टात आव्हान देण्याकरीता आम्हाला संधी मिळायला हवी, असा युक्तिवाद ईडीच्या वकीलांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आता ईडीच्या युक्तीवादावर उच्च न्यायालय काय निर्णय देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सध्याच्या कसोटीच्या काळात संजय राऊत यांना जामीन मिळणे हा ठाकरे गटासाठी मोठा दिलासा मानला जात आहे. गेल्या १०० दिवसांपासून संजय राऊत पत्राचाळ घोटाळा प्रकरणात तुरुंगात होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्याकडून जामिनासाठी प्रयत्न सुरु होते. मात्र, आतापर्यंत पीएमएलए कोर्टाने त्यांना दिलासा दिलेला नव्हता.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar : हृदयद्रावक! इकडे बहिणीचा जन्म आणि दुसरीकडे भावाचा मृत्यू; माऊलीच्या आक्रोशाने सातपुडा सुन्न

Maharashtra News Live Update: भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक आमने-सामने, जोरदार घोषणाबाजी

पावसाळ्यात दही खाल्ल्याने सर्दी-खोकला होतो का? Should You Eat Curd During Monsoon

Eexcessive sleepiness: सतत झोप येतेय? या 7 धक्कादायक कारणांमुळे तुमचं शरीर देतंय मोठा इशारा

घटसर्प आणि धनुर्वातीची लस घेतली, १६ वर्षाच्या मुलीचा बेशुद्ध पडून मृत्यू, नाशिकमध्ये वैदकीय क्षेत्रात खळबळ

SCROLL FOR NEXT