Amit Thackeray and Sada Sarvankar  Saam Tv
मुंबई/पुणे

Amit Thackeray: अमित ठाकरेंना भाजपचा पाठिंबा, माहीममधून सरवणकर माघार घेणार? BJP च्या भूमिकेने शिंदेंची कोंडी?

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीत चांगलीच चुरस रंगलीय.. त्यातच माहीममध्ये मोठा ट्विस्ट निर्माण झालाय. भाजपने अमित ठाकरेंना पाठींबा देण्याची भूमिका घेतलीय.. त्यावरून महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

Satish Kengar

भरत मोहोळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलंय. त्यातच राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे माहीममधून निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. शिंदे गटाने सदा सरवणकरांना उमेदवारी दिलीय. तर ठाकरेंनी प्रभादेवी-दादरमधला आपला हुकमी एक्का महेश सावंतांना मैदानात उतरवलंय. त्यामुळे माहीमची निवडणूक चुरशीची होणार, हे स्पष्ट झालं असतानाच माहीममध्ये मोठा ट्विस्ट निर्माण झालाय.

अमित ठाकरेंच्या उमेदवारीला पाठींबा देण्याची भूमिका भाजपने घेतलीय. तर सरवणकरांबाबतचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील, असं म्हणत उदय सामंतांनी सावध भुमिका घेतलीय. 'अमित यांना पाठिंबा देण्यास काय हरकत?', असं भाजप नेते आशिष शेलार म्हणाले आहेत. तर याचसंदर्भात बोलताना उदय सामंत म्हणाले की, सरवणकरांनी पडत्या काळात साथ दिली.'

भाजपने अमित ठाकरेंना पाठींबा देण्याची भूमिका मांडताच एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय दीपक केसरकरांनी थेट राज ठाकरेंची भेट घेतली. त्यामुळे चर्चांना उधाण आलंय. मात्र अमित ठाकरेंना पाठींबा देण्याच्या भाजपच्या भुमिकेचा राजकीय अर्थ काय? हे जाणून घेऊ

भाजपचा ठाकरेंना पाठींबा का?

  • लोकसभा निवडणूकीतील बिनशर्त पाठींब्याची परतफेड करण्याचा प्रयत्न.

  • अमित ठाकरेंना पाठींबा देऊन उद्धव ठाकरेंना संकुचित ठरवण्याचा प्रयत्न.

  • हिंदुत्व आणि ठाकरे कुटुंबासाठी तत्पर असल्याचं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न.

मात्र निवडणुकीतून माघार घेणार नसल्याचं सदा सरवणकरांच्या मुलानं स्पष्ट केलंय. त्यामुळे हा या जागेवरून महायुतीत वाद होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणूकीत राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठींबा देत पुणे, ठाणे, सिंधुदूर्ग आणि मुंबईत सभा घेऊन प्रचारही केला. त्याची परतफेड करण्यासाठी भाजपने अमित ठाकरेंना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला असला तरी बंडानंतर शिंदेंना साथ देणाऱ्या सदा सरवणकर यांच्या उमेदवारीचं काय? असा नवा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे माहीमच्या मैदानात तिरंगी लढत होणार की सदा सरवणकरांची मनधरणी केली जाणार? याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll : निलंगा विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण?

Saam Exit Poll: डोबिंवली विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपमधून रवींद्र चव्हाण मारणार बाजी? पाहा Exit Poll

कणकवलीत नितेश राणे पुन्हा मारणार बाजी? पाहा Exit Poll

Exit Poll Maharashtra : बीडमध्ये शरद पवार की अजित पवार? कोणाचा उमेदवार मारणार बाजी? पाहा VIDEO

Bigg Boss 18: 'मेरी मर्जी...' म्हणत विवियन अन् अविनाशने घरात घातला धुमाकूळ, 'टाइम गॉड' दिग्विजयच्या तोंडचे पाणी पळाले

SCROLL FOR NEXT