Devendra Fadnavis And Uddhav Thackeray News
Devendra Fadnavis And Uddhav Thackeray News Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार? दोन्ही नेत्यांनी दिले संकेत!

साम टिव्ही ब्युरो

Devendra Fadnavis And Uddhav Thackeray News : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय संघर्ष उभ्या महाराष्ट्रानं पाहिला. याच संघर्षातून महाराष्ट्रात मोठ्या राजकीय उलथापालथी झाल्या. आधी २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा हीच वेळ आली. गेल्या काही दिवसांपासून हा संघर्ष आणखीच वाढला आहे. मात्र, आता लवकरच हा संघर्ष संपण्याची चिन्हं आहे. (Latest Marathi News)

कारण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी एकमेकांबाबत अशी काही सूचक विधानं केली आहे, की ज्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. देवेंद्र फडणवीस हे आमचे शत्रू नाहीत. त्यांच्याशी आमचे केवळ वैचारिक मतभेद आहेत, असं स्पष्टीकरण माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलं आहे. (Maharashtra Political News)

दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनीही याला दुजोरा दिलाय. महाराष्ट्राच्या राजकारणात अलिकडे शत्रुत्वाची भावना निर्माण झाली असून ती संपवण्याची गरजही फडणवीसांनी व्यक्त केलीय.गेल्या ४ वर्षांपासून एकमेकांवर टीकेचा भडीमार करणारे फडणवीस आणि ठाकरे यांनी अचानक एकमेकांबाबत सूचक विधानं केल्याने आता देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

'देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे आणि वडील उद्धव ठाकरे यांच्यासोबत चांगले संबंध आहे आणि ते आजही आहे. आमच्या मनात कधीही कटुता नाही. आमच्या घरात आम्ही कुणालाही व्यक्तिगत पातळीवर शत्रू मानत नाही' असं वक्तव्य माजी मंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केलं. गेल्या काही वर्षांमध्ये आमच्या कुटुंबावर अनेक आरोप करण्यात आले अगदी खालच्या थराला जावून आरोप करण्यात आले. कधीही माझ्या तोंडातून याबद्दल कधीही अशी विधानं आली नाही, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

ठाकरेंच्या वक्तव्याला फडणवीसांचा दुजोरा

उद्धव ठाकरे किंवा आदित्य माझे शत्रू नसून आम्ही वैचारिक विरोधक झालोय, कारण ठाकरे यांनी दुसरा विचार पकडलाय. त्यामुळे आम्ही वैचारिक विरोधक आहोत, शत्रू बिलकुल नाही. महाराष्ट्रात एक संस्कृती आहे. राजकारणात वैचारिक विरोध असतो मात्र अलीकडच्या काळात शत्रुत्व बघायला मिळतेय ते योग्य नाही. ते कधीतरी संपवावे लागेल, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

आधी देवेंद्र फडणवीसांची सत्ता गेली, ठाकरेंची आली... शिवसेनेत मोठं बंड झालं... ठाकरेंची सत्ता गेली, पुन्हा फडणवीस सत्तेवर आले. ठाकरे विरुद्ध फडणवीस हा सामना चांगलाच गाजला. मात्र, आता दोन्ही नेत्यांनी एकमेकांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे लवकरच या सामन्याला नवी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळंच ठाकरे आणि फडणवीसांची पुन्हा युती झाली तर धक्का बसायला नको. कारण राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं. कुणी कुणाचा कायमचा मित्र नसतो आणि शत्रूही.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले; पर्यटक आणि भाजपच्या नेत्यावर गोळीबार

Relationship Tips: लग्नाआधी भावी जीवन साथीदाराला विचारा 'हे' ३ प्रश्न; नाहीतर आयुष्यात येतील दुःख

Chandu Champion Trailer: कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचा 'चॅम्पियन' ट्रेलर रिलीज

ED कडून थेट अटक करण्यावर आता बंधनं, PMLA वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

SCROLL FOR NEXT