Madhav Bhandari Saam Tv
मुंबई/पुणे

BJP Vs Shinde Group: कल्याणमध्ये भाजप शिंदे-गट येणार आमनेसामने? माधव भंडारी यांनी केलं मोठं वक्तव्य

Madhav Bhandari: गेल्या महिनाभरापासून बॅनर होर्डिंगच्या माध्यमातून शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याकडून अप्रत्यक्षरित्या भाजप आमदार गणपत गायकवाड यांना लक्ष केलं जातंय.

Saam Tv

अभिजित देशमुख, साम टीव्ही, प्रतिनिधी

गेल्या महिनाभरापासून बॅनर होर्डिंगच्या माध्यमातून शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याकडून अप्रत्यक्षरित्या भाजप आमदार गणपत गायकवाड यांना लक्ष केलं जातंय. याबाबत बोलताना भाजप प्रवक्ता माधव भंडारी यांनी स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. भंडारी यांनी बोलताना स्थानिक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी अशा प्रकारची भूमिका जाहीरपणे मांडण्याची आवश्यकता नाही, त्यांनी आपल्या नेत्यांकडे बोलावं. ते आमच्या नेत्यांशी बोलतील, दोघांमध्ये चर्चा होईल.

ते म्हणाले, या ठिकाणी आमचे विद्यमान आमदार आहेत. आमच्या आमदारांचं ,आमचं जे काम आहे, त्या आधारे निर्णय होईल असे सूचक विधान भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी केलं. महाराष्ट्रात प्रथमच कल्याणमध्ये बांगलादेशातील परिस्थिती, सत्य आणि संकटे या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी बोलताना ते असं म्हणाले आहेत. या कार्यक्रमात भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड, जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी शशिकांत कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. भंडारी सूचक विधानामुळे पुन्हा राजकीत वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

यावेळी पत्रकारांशी बोलताना भंडारी म्हणाले की, बांगलादेशची आर्थिक प्रगती व्हावी. त्याठिकाणच्या हिंदूना संरक्षण मिळावे. भारत आणि बांगलादेशाचे चांगले संबंध राहिले आहेत. त्यामुळे गेल्या दहा वर्षात बांगलादेशाची आर्थिक परिस्थिती सुधारली होती. ज्यांना ही परिस्थिती मान्य नव्हती. त्यांनी कारस्थाने करुन बांगलादेशात सत्ता पालट केला आहे.

ते पुढे म्हणाले की, बांगलादेशातील या राजकिय परिस्थितीचा भारतावर परिमाम होणार आहे. त्याठिकाणी हिंदूवर अत्याचार झाले आहेत. ते हिंदू निर्वासीत म्हणून त्यांना भारतात यावे लागेल. त्यांच्यासोबत त्याठिकाणचे मुस्लीम देखील भारतात येऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss : झपाट्याने वजन कमी करायचंय? ‘हे’ पदार्थ खाणे आताच थांबवा

Gold Price Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? पाहा तुमच्या शहरातील २४, २२ आणि १८ कॅरेट आजचे दर

Actor Death: ज्येष्ठ अभिनेते काळाच्या पडद्याआड; मुलाने दिली निधनाची बातमी, सिनेविश्वाला मोठा धक्का

Maharashtra News Live Update: रत्नागिरी- रायगडचा पालकमंत्री कोणाला करायचं हे तिन्ही नेते एकत्र बसून लवकर निर्णय घेतील- चंद्रशेखर बावनकुळे

Fashion Tips : या कारणामुळेच काही कपडे घातल्यावर चेहरा उजळतो आणि काहींमध्ये डल दिसतो!

SCROLL FOR NEXT