बीडीडी पुनर्विकास रखडणार? पुनर्विकास विरोधात स्थानिकांचे उपोषण..! सूरज सावंत
मुंबई/पुणे

Mumbai : बीडीडी पुनर्विकास रखडणार? पुनर्विकास विरोधात स्थानिकांचे उपोषण!

महात्मा गांधी जयंतीनिमित्त, बी.डी.डी. चाळ पुर्नबांधणी सरकारच्या धोरणाबाबत लक्षवेधी एकदिवसीय उपोषण केले आहे. या उपोषणात सर्वपक्षीय पदाधिकारी आणि स्थानिक सहभागी आहेत.

सूरज सावंत

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच गाजावाजा करत बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचं भूमिपूजन केलं. मात्र, स्थानिकांचा मागण्या मान्य झाल्या नाहीत, त्यामुळे त्यांचा या पुनर्विकासाला विरोध आहे. त्यात अखिल बीडीडी चाळी सर्व संघटनांनी एकत्रितपणे 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त, बी.डी.डी. चाळ पुर्नबांधणी सरकारच्या धोरणाबाबत लक्षवेधी एकदिवसीय उपोषण केले आहे. या उपोषणात सर्वपक्षीय पदाधिकारी आणि स्थानिक सहभागी आहेत.

हे देखील पहा :

मागण्या काय आहेत?

१. सर्व प्रथम कायम स्वरुपी घराचा कायदेशीर व सुरक्षित करारनामा नंतर पुनर्विकास

२. ३३ ( ९ ) BIIIA आणि B कायदा रद्द करावा .

३. सन १ ९९ ६ व त्या पूर्वीच्या पुराव्यांची अट रद्द करावी आणि सन २०२१ पर्यंत खोली खरेदी विक्री कलेल्या सर्व रहिवाशांना पात्र / अपात्र आणि अनिर्णित न करता पुनर्विकास मध्ये सामावून घेण्यात यावे .

४. ३३ ( ५ ) हा कायदा म्हाडाच्या ५६ वसाहतींना लागू आहे . तोच कायदा बीडीडी चाळींकरीता लागू करावा . ( जेणे करुन ५०० फुट पेक्षा जास्त एरिया मिळेल . )

५. १७ ते २५ लाख पर्यंत कॉपर्स फंड मिळावा .

६. बायोमेट्रिक / पात्र / अपात्र व अनिर्णित अट रद्द करावी .

भिडे पुनर्विकास हा महाविकास आघाडी सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे थाटामाटात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या प्रकल्पाचा शुभारंभ झाला आहे. मात्र, महाविकास आघाडीतील नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील, तिन्ही पक्षातील पदाधिकारी व स्थानिक याला आता विरोध करत आहेत. पुनर्विकास करताना स्थानिकांनी काही मागण्या केल्या आहेत. त्या सरकार मान्य करत नाही तोपर्यंत पुनर्विकास होऊ देणार नाही; अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळेच सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज एक दिवसीय लक्षवेधी उपोषण स्थानिक व बीडीडी चाळ संघटनांकडून करण्यात आले. पुढील काळात जर सरकारने लक्ष दिले नाही तर मोठे जनांदोलन करण्यात येईल, असे अखिल बीडीडी चाळी सर्व संघटनांच्या एकत्रित संघाचे अध्यक्ष डॉ.राजू वाघमारे यांनी सांगितले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

Maharashtra Politics : भाजपमध्ये अल्पसंख्याक सेल का? व्होट जिहादच्या आरोपावर मनसेचा खोचक सवाल

Crime News: पुणे, बीडनंतर आता लातूरमध्ये गुंडाराज;भरचौकात तरुणावर तलवारीनं हल्ला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Jio Special Offer: सासू सुनेचा राडा ते सस्पेन्स ड्रामा; १ रुपयात ३० फुलऑन दिवस मनोरंजन

Paneer Recipe : पनीर बिर्याणी अन् मटर पनीर खाऊन कंटाळलात? मग 'ही' चटपटीत रेसिपी एकदा ट्राय कराच

SCROLL FOR NEXT