Kadave Khind Accident  SAAM TV
मुंबई/पुणे

Kadave Khind Accident : कादवे खिंडीत रानडुकराच्या हल्ल्यानंतर धावती रिक्षा थेट खोल दरीत कोसळली; १ भाविक ठार, ३ जखमी

Pune Velhe Accident News : पानशेत धरण खोऱ्यातील कादवे खिंडीतून वरघड येथे जात असताना भाविकांच्या रिक्षावर एका रानडुकराने अचानक हल्ला केला.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

मनोज कुंभार, वेल्हे

Pune Velhe Accident News : पानशेत धरण खोऱ्यातील कादवे खिंडीतून वरघड येथे जात असताना भाविकांच्या रिक्षावर एका रानडुकराने अचानक हल्ला केला. धावत्या रिक्षाला जोरदार धडक दिल्यानंतर ती उलटली आणि खोल दरीत कोसळली.

या दुर्घटनेत एक भाविक जागीच ठार झाला. तर त्याचा चुलत पुतण्या गंभीर जखमी झाला. रिक्षा चालकासह दोघांना जबर मार लागला आहे, अशी माहिती मिळाली. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, भागुजी धाऊ मरगळे (वय ६०, सध्या राहणार नसरापूर, मूळचा शिरकोली ,ता.वेल्हे) असे मृत भाविकाचे नाव आहे. मरगळे यांचा चुलत पुतण्या गंभीर जखमी झाला आहे. पांडुरंग धाऊ मरगळे ( वय ४५ ,रा. शिरकोली , सध्या राहणार डोणजे) असं त्याचं नाव आहे. त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर तिथे उपचार सुरू आहेत.  (Accident News)

रिक्षाचालक सुरेश कोंडीबा ढेबे ( रा. पोळे, ता. वेल्हे) आणि अशोक बबन मरगळे ( वय ३१, रा. शिरकोली) अशी इतर दोन जखमींची नावे आहेत. याबाबत वेल्हे पोलीस ठाण्यात अद्यापही अपघात झाल्याची नोंद नसल्याची माहिती वेल्हेचे सहाय्यक पोलीस फौजदार सुदाम बांदल यांनी दिली. ही घटना शुक्रवार (ता. २४ ) रोजी पहाटेच्या सुमारास घडली होती.

असा घडला अपघात

रिक्षा कादवे खिंडीतून वरघड येथे जात होती. या रिक्षातून भाविक प्रवास करत होते. खिंडीत रिक्षा आली असता, एका रानडुकरानं अचानक हल्ला चढवला. रानडुकरानं धावत्या रिक्षाला जोरदार धडक दिली. त्यामुळं रिक्षा उलटली. ती थेट खोल दरीत जाऊन कोसळली. या अपघातात वयोवृद्ध भाविकाचा मृत्यू झाला. तर अन्य तिघे जखमी झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: धावत्या ट्रेनमध्ये टीसीने केला विद्यार्थिनीवर बलात्कार; तिकीट चेक करताना पकडलं नंतर एसी कोचमध्ये नेत...

Dog Bite: कुत्रा चावला, ३ इंजेक्शनही घेतले, पण..; उपचारादरम्यान ८ वर्षाच्या मुलाचा रुग्णालयातच मृत्यू

Akki Roti Recipe: सकाळच्या नाश्ताला काही वेगळं करायचंय? तर अक्की रोटी अन् नारळाची चटणी एकदा करून पाहाच

Maharashtra Live News Update: पुणे महापालिका मुख्य सभेत पाणी प्रश्नावरून काँग्रेस आक्रमक

Women Weight Loss: महिलांमध्ये अचानक वजन वाढण्याची कारणे कोणती?

SCROLL FOR NEXT