MPSC परीक्षांची तयारी करणाऱ्या पत्नीची OYO हॉटेलमध्ये गळा आवळून हत्या ! गोपाल मोटघरे
मुंबई/पुणे

MPSC परीक्षांची तयारी करणाऱ्या पत्नीची OYO हॉटेलमध्ये गळा आवळून हत्या !

ताथवडे परिसरातील ओयो टाऊन हाऊस (OYO Town House) हॉटेलच्या रूम नंबर (301) मध्ये ही घटना घडली आहे.

गोपाल मोटघरे

गोपाल मोटघरे

पुणे : पिंपरी-चिंचवड शहरातील MPSC परीक्षांची तयारी करणाऱ्या पत्नीची पतीने गळा आवळून हत्या धक्कादायक घटना घडली आहे. ताथवडे परिसरातील ओयो टाऊन हाऊस (OYO Town House) हॉटेलच्या रूम नंबर (301) मध्ये ही घटना घडली आहे. हेमंत अशोक मोहिते या तरुणाने आपली पत्नी सपना अशोक गवारे हिचा हॉटेलच्या रूममध्ये स्कार्फच्या सहाय्याने गळा आवळून खून केला आहे.

OYO Town House

सपना, ही पुण्यात (Pune) स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती, त्यादरम्यान तिचं मॅट्रिमोनिअल साईटच्या माध्यमातून कराडचा ट्रान्सपोर्ट व्यावसायिक हेमंत मोहिते यांच्याशी ओळख झाली होती. पुढे ओळखीचे रूपांतर प्रेमात झालं आणि प्रेमाचं रूपांतर लग्नात !

त्यामुळे 28 ऑक्टोंबर 2021 ला सपना आणि हेमंत ने आळंदी येथे घरच्यां लोकांच्या परवानगी शिवाय लग्न केलं होतं. मात्र, सपनाच्या घरच्यांना या लग्नाला विरोध असल्याने तिच्या घरच्यांनी तिला हेमंतशी फारकत घ्यायला सांगितली होत. तरीदेखील सपना हेमंतला भेटायची, ते मागील काही दिवसांपसून वेगवेगळ्या हॉटेल आणि लॉज मध्ये वास्तव्यास होते. मात्र काल ओयो टाऊन हाऊस हॉटेलमध्ये वास्तव्यास असतांना हेमंत आणि सपनात किरकोळ कारणावरून भांडण झालं. याच भांडणातून हेमंत ने सपनांचा स्कार्फच्या सहाय्याने गळा आवळून खून केला आहे. या प्रकरणात सपनाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून वाकड पोलिसांनी हेमंत मोहिते विरोधात गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : कपड्याच्या दुकानातून पावणे चार लाखांची रोकड लंपास; चोरटे सीसीटीव्हीत कैद

Women Qualities: महिलांच्या या सवयीचं पुरूषांकडून होतं कौतुक, जिंकतात हृदय

Parenting Tips: मुलांना शिस्त लावायची आहे? मग पालकांनी ही चूक कधीच करु नका अन्यथा...

Maharashtra Election : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात दोन्ही सेनेचे शिवसैनिक आमनेसामने; पुढे नेमकं काय घडलं? वाचा

VIDEO : केलंय काम भारी, लुटली तिजोरी; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

SCROLL FOR NEXT