Mumbai : नवऱ्याच्या अनैतिक संबंधामुळे बायकोची आत्महत्या; गोरेगावमधील धक्कादायक घटना Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai : नवऱ्याच्या अनैतिक संबंधामुळे बायकोची आत्महत्या; गोरेगावमधील धक्कादायक घटना

नवऱ्याकडून होणारी सततची मारहाण आणि त्याचे बाहेर असणारे अनैतिक संबंधांमुळे चितेंत असणाऱ्या एका 33 वर्षीय महिलीने गळफास घेऊन आपले आयुष्य संपविल्याची धक्कादायक घटना गोरेगाव परिसरामध्ये घडली आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : नवऱ्याकडून होणारी सततची मारहाण आणि त्याचे बाहेर असणारे अनैतिक संबंधांमुळे चितेंत असणाऱ्या एका 33 वर्षीय महिलीने गळफास घेऊन आपले आयुष्य संपविल्याची धक्कादायक घटना गोरेगाव परिसरामध्ये घडली आहे. मृत महिलेचा नवरा तिला सतत मारहाण करायचा आणि त्याच्या या अत्याचाराला कंटाळूनच आपल्या मुलीने आत्महत्या केल्याची माहिती मृत विविहितेच्या वडिलांनी पोलिसांना दिली आहे. या प्रकरणातील आरोपी पतीचे नाव अजितप्रताप सिंग असं आहे.

मृत महिलेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 10 मे 2007 रोजी मित्राचा मुलगा असलेल्या अजितप्रताप सिंग सोबत त्यांनी आपल्या मुलीचा विवाह (Marriage) लावून दिला. मात्र लग्नानंतर काही वर्षाने अजितप्रताप मलीला मारहाण करायचा दरम्यान 3 जानेवारीला मुलीची प्रकृती गंभीर असल्याचा फोन आला. मात्र आपण रुग्णालयात येताच तिचा मृत्यू झाल्याचे समजले दरम्यान याबाबतीत जावयाकडे चौकशी केली असता मुलीने गळफास घेतल्याचे त्याने सांगितले मात्र अजितप्रताप सिंगच्या रोजच्या मारहाणीला कंटाळूनच आपल्या मुलीने आत्महत्या केल्याचा मृत महिलेच्या वडिलांनी केला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Milk Price Hike: सणासुदीच्या दिवसांत मुंबईकरांना महागाईचा झटका, दूधाच्या दरात ९ रुपयांची वाढ

Maharashtra News Live Update: भाजप ची राज्य कार्यकारणी ३१ ऑगस्ट रोजी पुण्यात पार पडणार

नेपाळमध्ये पुराचा हाहाकार; काठमांडूला कसे पोहोचणार? ३७ महाराष्ट्रीयन भाविकांसाठी मुख्यमंत्र्यांनी हलवली सूत्रे, नेमकं काय घडलं?

Right Time For Walking: सकाळी की संध्याकाळी? वजन कमी करण्यासाठी नक्की कोणती वेळ चालणे जास्त फायदेशीर

Political News : लिंबू कापला पाऊस थांबवला! भाजप खासदाराचा भर कार्यक्रमात अजब दावा

SCROLL FOR NEXT