मदुरै - देशासह जगभरामध्ये कोरोना विषाणूने (Corona virus) पुन्हा एकदा थैमान घातलं आहे, पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अशातच कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन (Omicron) व्हेरिएंटची देखील नवी भर पडल्याने नागरिकांनामध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे. अशातच आता प्रत्येक राज्य कोरोना निर्बंध वाढवत आहे. आणि त्यामुळे लोकांच्या मनात कोरोनानं चांगलीच दहशत निर्माण केल्याचं पहायला मिळत आणि नव्या निर्बंधांमुळे व्यावसाय़िक वर्ग चांगलाच चिंतेत सापडला आहे. मात्र या सगळ्या परिस्थितीमध्ये तामिळनाडूमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेने सगळेच हादरले आहेत.
तामिळनाडूमधील एका कुटुंबातील 23 वर्षीय जोतिका नावाच्या महिलेने कोरोनाच्या भितीने आपल्या 3 वर्षाच्या मुलासह विष पिऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या मयत महिलेच्या कुटुंबातील सदस्यांनी कोरोनाच्या भीतीने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये त्या महिलेचा भाऊ आणि तिच्या आईचाही समावेश आहे. दरम्यान तामिळनाडू पोलिसांनी सांगितले की, विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांपैकी चौघांपैकी दोघांचा जीव वाचवण्यात यश आलं आहे. मात्र जोतिका आणि तिच्या 3 वर्षाच्या मुलाचा मात्र या घटनेत अंत झाला आहे.
हे देखील पहा -
जोतिका तिच्या पतीपासून वेगळी राहते. ती तिच्या आई आणि भावासह माहेरीच राहत होती. तर जोतिकाचे वडीलांचेही डिसेंबरमध्ये निधन झालं होतं. त्यामुळे कुटुंबावर आर्थिक दबाव होता अशातच झालेला कोरोनाचा उद्रेक आणि अशातच जोतिकाला कोरोनाची (Corona) लागण झाल्याचं तिने तिच्या आईला दिली. आणि संपुर्ण कुटुंबच हादरलं घाबरलेल्या घरातील सदस्यांनी आणि आत्महत्या करण्याचं ठरवंल आणि त्यानंतर त्यांनी विष पिलं या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी पोहचले आणि जखमी अवस्थेतील सदस्यांना रुग्णालयामध्ये दाखलं केले मात्र जोतिका आणि तिच्या तीन वर्षाच्या मुलाचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं नाही. दरम्यान या सर्व घटनेचा अधिकचा तपास पोलिस करत आहेत. दरम्यान कोरोना संक्रमणाला घाबरु नका आत्महत्या करु नका काही कोरोना लक्षण आढळल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा असं निवेदन तामिळनाडू (Tamilnadu) सरकारने जारी केलं आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.