Police investigate after a woman allegedly attacked her husband with a knife during a domestic dispute in Mumbai’s Jogeshwari area. Saam tv
मुंबई/पुणे

भयंकर! रोज दारू का पितेस? भडकलेल्या बायकोने नवऱ्यावर केला चाकू हल्ला

Wife Attacks Husband After Alcohol Argument In Mumbai: मुंबईतील जोगेश्वरी परिसरात दारूच्या नशेत पत्नीने पतीवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Omkar Sonawane

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबईतील जोगेश्वरी परिसरात एक धक्कादायक कौटुंबिक वादाची घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत असलेल्या पत्नीने संतापाच्या भरात पतीवर चाकूने हल्ला केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार पती मोहोम्मद रफिक कुरेशी हे प्लंबरचे काम करतात. 31 मार्च रोजी रात्री कामावरून घरी परतल्यावर त्यांची पत्नी सबा कुरेशी ही दारूच्या नशेत असल्याचे त्यांना आढळले. यावरून रोज दारू का पितेस? असा सवाल केल्यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद झाला.

या वादातून संतापलेल्या पत्नीने घरातील भाजी चिरण्याच्या चाकूने पतीवर हल्ला केला. या हल्ल्यात पतीच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आंबोली पोलीस ठाणे येथे पत्नी सबा कुरेशी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कौटुंबिक वादाचे गंभीर रूप पुन्हा एकदा समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी ई-केवायसीनंतर 'लाडकी बहीण' योजनेतील १ कोटी लाभार्थ्यांचा ₹१५०० चा हप्ता बंद, महत्त्वाची अपडेट समोर

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये ट्रॅक्टर पुलावरून नदीत कोसळला, एकाचा जागीच मृत्यू

Child growth: मुलाची उंची आणि वजन योग्य आहे का? या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास वाढीवर होऊ शकतो परिणाम

Thackeray Vs Shinde : ठाकरेंना शिंदेंचा झटका; आता 'सोशल' स्ट्राइक, मुंबईसह महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी शिंदेसेनेत

India Fort : किल्ल्यातच वसलंय अर्ध शहर, जगातील 'हे' अनोखं ऐतिहासिक ठिकाण पाहिलंय का?

SCROLL FOR NEXT