ED Raid News  Saam TV
मुंबई/पुणे

ED Raid on Bharatkshetra Shop : दादरमधील 'भरतक्षेत्र' दुकानावर ईडीची धाड का पडली? झाडाझडतीत काय सापडलं? सगळं आलं समोर

ED Raid on Bharatkshetra Saree Shop : भरतक्षेत्र साडीचे दुकान आणि त्याच्या मालकांच्या घरावर ईडीने टाकलेल्या छाप्यात तब्बल १५ लाख रुपयांची कॅश ईडीने जप्त केल्याची माहिती आता समोर आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन गाड

Mumbai News :

अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने काल म्हणजे ६ डिसेंबर रोजी दादरमधील भरतक्षेत्र या साडीच्या दुकानावर धाड टाकली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांना मुंबईत ५-६ ठिकाणी झाडाझडतीही घेतली. यात अनेक कागदपत्रांची तपासणी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. मनी लॉन्ड्रीच्या अनुषंगाने ईडी तपास करत असल्याची माहिती समोर येत आहे.

भरतक्षेत्र साडीचे दुकान आणि दुकानाचे मालक मनसुख गाला यांच्या घरावर ईडीने बुधवारी धाड टाकली होती. या धाडीत ईडीने तब्बल १५ लाख रुपयांची कॅश जप्त केल्याची माहिती आता समोर आली आहे.

ईडीने भरतक्षेत्रचे मालक मनसुख गाला, त्यांचे चार्टर्ड अकाउंटंट आणि इतरांच्या एकूण पाच ठिकाणांवर छापे टाकले होते. या सर्व ठिकाणी ईडीच्या अधिकाऱ्यांना कसून तपासणी केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तब्बल १२ तास हे सर्च ऑपरेशन सूरू होते. २०१९ साली बांधकाम व्यवसायिक अरविंद शहा यांच्या तक्रारीवर दाखल झालेल्या फसवणूक आणि फॉर्जरीच्या प्रकरणात हे सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. (Latest News Update)

बांधकाम क्षेत्रातील एका कंपनीत अरलविंद शहा आणि मनसुख गाला हे दोघे भागीदार आहेत. मात्र गाला यांनी बेकायदेशीररित्या शहा यांच्या कुटुंबाचे कंपनीतील ५० टक्के भाग २५ टक्क्यांवर आणल्याचा शहांचा आरोप आहे. ज्याने त्यांना तब्बल ११३ कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. याप्रकरणात मनी लॉन्ड्रीच्या अनुषंगाने ईडी तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bakuli Haar Designs: महाराष्ट्राचा अस्सल पारंपारिक दागिना 'बकुळी हार', लेटेस्ट 5 डिझाईन्स कोणत्या?

Maharashtra Live News Update: लव जिहाद कायदा झालाच पाहिजे - आमदार संग्राम जगताप

अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरण: १० वर्षानंतरही न्याय नाही, कुटुंबांनी केली इच्छामरणाची मागणी

सौरऊर्जा प्रकल्पात १२२.५८ कोटींचा मोठा फसवणूक प्रकार; 'या' चार कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल

Holi 2026 : होळी खेळण्यापूर्वी 'हे' १ काम करा, रंगाचा डागही पडणार नाही अन् चेहरा हिऱ्यासारखा चमकेल

SCROLL FOR NEXT