mumbai News: माजी शालेय शिक्षण मंत्री आणि काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांची काँग्रेसच्या मुंबईच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भाई जगताप यांना पदावरून हटविण्यात आले आहे. काँग्रेस आमदार भाई जगताप यांची मुंबई अध्यक्षपदावरून गंच्छती का झाली, यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. (Latest Marathi News)
माजी खासदार एकनाथ गायकवाड यांची कन्या माजी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदावर निवड झाली आहे. तर काँग्रेस आमदार भाई जगताप यांच्या गंच्छतीनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात आहेत. वर्षा गायकवाड यांची काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदावर निवड का झाली, यामागची कारणे समजून घेऊयात.
भाई जगताप यांची गंच्छती का झाली?
विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसने चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप यांना उमेदवारी दिली होती. चंद्रकांत हंडोरे यांना क्रमांक एकची मत मिळणे अपेक्षित असताना हंडोरे पडले. तर भाई जगताप निवडून आले. याबाबत काँग्रेसने चौकशी समिती नेमली होती.
हंडोरे यांचा पराभव म्हणजे पक्षात त्यांच्या विरोधात गटबाजी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे अनुसूचित जातींमध्ये चुकीचं संदेश गेला होता. यामुळे भाई जगताप यांची उचलबांगडी झाली आहे.
भाई जगताप हे मुंबई काँग्रेस अध्यक्ष असताना पक्ष वाढीसाठी विशेष योगदान राहिले नाही. त्यांच्या विरोधात तक्रारी होत्या. त्यामुळे आमदार वर्षा गायकवाड यांना संधी मिळाली. वर्षां गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाड यांनी देखील या पदाची जबाबदारी घेतली होती. मुंबई काँग्रेसमध्ये नेहमीच गटबाजी राहिली आहे.
संजय निरुपम विरुद्ध भाई जगताप संघर्ष पक्षात पहायला मिळाला. काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदावर निवड झाल्यानंतर या गटांना एकत्र घेऊन काम करण्याचे आव्हान वर्षा गायकवाड यांच्या समोर आहे. मुंबई महापालिकेत काँग्रेस हे ३० नगरसेवक आहे. त्यांची संख्या वाढवणे आव्हान आहे.
वर्षा गायकवाड या ठाकरे सरकारच्या काळात शालेय शिक्षण मंत्री होत्या. तसेच दिवंगत माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या कन्या आहेत. 3 फेब्रुवारी 1975 रोजी त्यांचा जन्म झाला. 2004 च्या महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत त्यांनी सक्रिय राजकारणात पाऊल ठेवले. तसेच गायकवाड या धारावी विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात.
2009 मध्ये त्यांनी पुन्हा विजयाची पुनरावृत्ती केली आणि उच्च व तंत्र शिक्षण, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री म्हणून काम केलं. 2010 ते 2014 पर्यंत त्यांनी महिला आणि बालकल्याण मंत्री म्हणून काम केलं. 2014 मध्येही त्या धारावी मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आल्या होत्या. 2019 मध्ये निवडून आल्यानंतर त्या राज्याच्या पहिल्या महिला शिक्षण मंत्री झाल्या. तसेच वर्षा गायकवाड या काँग्रेसच्या पहिल्या महिला मुंबई अध्यक्षा ठरल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.