Sanjay Raut on Hindi Language  Saam Tv News
मुंबई/पुणे

हिंदी सक्ती विरोधात नाना-माधुरी गप्प का? मराठी कलाकार-साहित्यिकाचं मौन का? राऊतांचा कलाकार साहित्यिकांवर हल्लाबोल

Sanjay Raut on Hindi Language : राज्यात हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयावर मराठी कलाकारांनी कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांच्या मौनावरच राऊतांनी हल्लाबोल केलाय. राऊत नेमकं काय म्हणालेत? आणि कलाकार या प्रकरणी शांत का आहेत?

Bharat Mohalkar

भरत मोहोळकर, साम टिव्ही

मुंबई : सरकारच्या पहिलीपासून हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात राज्यात आंदोलनाची ठिणगी पडलीय. हिंदी सक्ती मागे घेण्याची मागणी सर्वच स्तरावरून केली जातेय. मात्र हिंदी सक्तीच्या मुद्दयावर नाना पाटेकर, प्रशांत दामले, माधुरी दिक्षितसह मराठी कलाकार गप्प का? असा सवालच राऊतांनी केलाय.

हिंदी सक्तीला होणाऱ्या विरोधानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी साहित्यिकांशी चर्चा करुन निर्णय घेण्याची भूमिका घेतलीय. मात्र सरकारचे लाभार्थी साहित्यिक भूमिका घेत नसल्याने राऊतांनी संताप व्यक्त केलाय. एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. तर दुसरीकडे हिंदी सक्तीचा निर्णय घेण्यात आला. मात्र हिंदी सक्तीचं प्रकरण नेमकं कुठून आलं? पाहूयात.

मुख्यमंत्र्यांच्या दाव्यानुसार त्रिभाषा सूत्र नवीन शिक्षण धोरण

2024 मध्ये शालेय स्तरासाठी राज्य अभ्यासक्रम आराखडा समिती

आराखड्यात समितीकडून हिंदी सक्तीचा उल्लेख

16 एप्रिल 2025

पहिलीपासून हिंदी सक्तीचा जीआर

विरोधानंतर हिंदी सक्तीचा निर्णय मागे

16 जून 2025

शुद्धीपत्रक काढून हिंदीबाबतचा अनिवार्य शब्द हटवला

राज्यात हिंदी सक्तीला राजकीय पक्षांनी आणि अगदीच मोजक्या साहित्यिक आणि कलाकारांनी विरोध केलाय. मात्र अनेक दिग्गज कलाकारांनी या मुद्द्यावर मौन बाळगणंच पसंत केलंय. निदान मराठीच्या मुद्दयावर तरी कलाकारांनी व्यक्त व्हावं एवढीच माफक अपेक्षा आहे. त्यामुळे आता राऊतांच्या टीकेनंतर तरी मराठी कलाकार ठोस भूमिका घेणार की हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - नाशिकमध्ये थंडीची चाहूल, नाशिककरांनी आज अनुभवली धुक्याची चादर

Ladaki Bahin Yojana : या लाडक्या बहि‍णींनाच यापुढे ₹१५०० मिळणार, आचारसंहितेतही खात्यावर येणार पैसे, वाचा

Konkan Sweet Dish : गोड खावसं वाटतंय? घरी बनवा कोकण स्पेशल 'ही' स्वीट डीश

Suraj Chavan kelvan : बिग बॉसचा हिरो चढणार बोहल्यावर; अंकिताच्या घरी थाटात पार पडलं केळवण, होणारी बायको आहे तरी कोण?

Panchang today in Marathi: आजचा दिवस कसा आहे? पंचांग, शुभ काळ आणि या चार राशींसाठी विशेष लाभ

SCROLL FOR NEXT