Shivsena Dasara Melava  Saam TV
मुंबई/पुणे

Shivsena Dasara Melava: दसरा मेळाव्यात कोणाचा आवाज मोठ्याने घुमला, ठाकरे की शिंदे? अहवाल आला समोर

शिवसेनेचे दोन्ही दसरा मेळावे काल पार पडले, दोन्ही मेळाव्यांमध्ये मोठा आवाज कोणाचा होता याचा अहवाल आता समोर आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

निवृत्ती बाबर -

मुंबई: संपुर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेला शिवसेनेचे दोन्ही दसरा मेळावे (Dasara Melava) काल पार पडले. मात्र, या मेळाव्यांमध्ये मोठा आवाज कोणाचा होता याचा अहवाल आता समोर आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यापेक्षा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सभेला आवाज सर्वाधिक असल्याचा निष्कर्ष आवाज फाऊंडेशनने काढला असून त्याबाबत त्यांनी अहवाल जारी केला आहे.

आवाज फाऊंडेशनच्या मोजणीत शिवाजी पार्कच्या (Shivaji Park) मेळाव्यात १०१.६ डेसिबल इतका आवाज होता. तर, वांद्र्यातील बीकेसीत एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यात ८८ डेसिबल इतका आवाज नोंदवला गेला आहे.

पाहा व्हिडीओ -

उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यात किशोरी पेडणेकर यांचा आवाज सर्वाधिक नोंदवला गेला. त्यांच्या भाषणावेळी ९७ डेसिबलपर्यंत आवाज गेला होता तर एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यात सर्वाधिक आवाज खासदार धैर्यशील माने यांचा ८८.५ डेसिबल नोंदवला गेला असल्याचं आवाज फाउंडेशनकडून सांगण्यात आलं आहे.

उद्धव ठाकरे यांच्या आवाजाची पातळी ८८.४ डेसिबल होती तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाजाची पातळी ८९.६ डेसिबल नोंदवण्यात इतकी नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे आवाज मोठा कोणाचा एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे यामध्ये आवाज फाऊंडेशनुसार शिंदेचा आवाज मोठा असंच आता म्हणाव लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भाजपचे खासदार धनंजय महाडिक सहपरिवार आमदार सतेज पाटील यांच्या भेटीला

PM Modi IIT Delhi: ‘जो शिकत राहील तोच जिंकेल’; IIT दिल्लीच्या विद्यार्थ्यांना PM मोदींनी दिला यशाचा खास मंत्र

Mumbai : मुंबई हादरली! शाळा सुटल्यावर मुलीला दुचाकीवर बसवले, निर्जनस्थळी नेऊन हात-पाय बांधून लैंगिक अत्याचार

मोठी बातमी! शरद पवारांचे खासदार मोदींची भेट घेणार, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Cancer cases increasing: कॅन्सरचे रुग्ण दिवसेंदिवस का वाढत आहेत? डॉक्टरांनी सांगितली 5 मोठी आणि धक्कादायक कारणं

SCROLL FOR NEXT