Abhishek Ghosalkar  Saam Tv
मुंबई/पुणे

Abhishek Ghosalkar : घोसाळकरांच्या हत्येसाठी मॉरिसने वापरलेले पिस्तुल कुणाचं? पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

प्रविण वाकचौरे

Abhishek Ghosalkar News Update :

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मॉरिस नोरोन्हा याने हत्या करुन आत्महत्या केली.

मुंबई पोलीस याप्रकरणी सखोल चौकसी करत आहेत. मॉरिस नोरोन्हा याने ज्या पिस्तुलातून या गोळ्या झाडल्या हे पिस्तुल नेमकं कुणाचं होतं, असा प्रश्न अनेकांना पडला होता.

पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार, मॉरिस नोरोन्हा याने वापरलेलं पिस्तुल सुरक्षा रक्षकाचं असल्याची माहिती समोर येत आहे. गुन्हे शाखेच्या तपासात ही माहिती उघड झाली आहे.  (Latest Marathi News)

मॉरिसने त्याच्याच सुरक्षा रक्षकाचं पिस्तुल घेऊन गोळीबार केला. मॉरिसने पाच गोळ्या झाडून अभिषेक घोसाळकरांची हत्या केली. त्यानंतर डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. पोलिसांनी याप्रकरणी मृत मॉरिसवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मॉरिशच्या कार्यालयातील तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांकडून तपासले जात आहेत. मॉरिस वापरलेली पिस्तुल पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मॉरिसकडे कोणत्याही प्रकारचा शस्त्र परवाना नव्हता.

मुंबई पोलिसांनी मृत आरोपी मॉरिस विरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. मुंबई पोलिसांच्या MHB पोलिसांनी आयपीसीच्या कलम 302, शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम 3 आणि 25 आणि महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या कलम 37 (1) (ए), आणि 135 नुसार गुन्हा दाखल केला.

अभिषेक घोसाळकर यांना चार गोळ्या लागल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. उजव्या मांडीला दोन गोळ्या, पोटात एक आणि छातीच्या डाव्या बाजूला एक गोळी लागल्याचे डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा

अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाची गृहमंत्र्यांनी सविस्तर माहिती घेतली आहे. नेमकं प्रकरण कोणत्या वादातून घडलं याची देखील त्यांनी माहिती घेतली आहे.

रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी चर्चा केल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्यात वर्षा निवासस्थानी जवळपास अर्धा तास चर्चा झाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sayaji Shinde Join NCP: अभिनेते सयाजी शिंदे विधानसभेच्या रिंगणात? अजित पावर गटात केला प्रवेश

Maharashtra News Live Updates : मध्यप्रदेशच्या रतलामवरून मुंबईला येणारा मोठा अफूचा साठा जप्त

Ajit Pawar: अजित पवार कॅबिनेट मिटिंगमधून बाहेर का पडले? खुद्द पवारांनी सांगितलं नेमकं कारण

Tata Group : रतन टाटा यांचा उत्तराधिकारी निवडला; नाव आलं समोर

Bopdev Ghat Case : ७०० पोलीस, ७०० CCTV अन् ८० किमीपर्यंत धागेदोरे; असा सापडला पोलिसांना चकवा देणारा बोपदेव घाट प्रकरणातील आरोपी

SCROLL FOR NEXT