Pune nanded vande bharat news Saam TV News
मुंबई/पुणे

Vande Bharat Express : पुण्यातून धावणार आणखी एक वंदे भारत, रेल्वे मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल, वाचा सविस्तर

Pune Vande Bharat Express Update : नांदेड वंदे भारत एक्सप्रेस लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. नांदेड, लातूर, धाराशिव हे थांबे असण्याची शक्यता आहे. ट्रेनने ११ ते १३ तास, तर बसने १० ते १२ तास लागतात.

Namdeo Kumbhar

  • पुणे - नांदेड वंदे भारत डिसेंबर २०२५ पर्यंत धावण्याची शक्यता.

  • रवींद्र चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्राकडून सकारात्मक संकेत.

  • लातूर, धाराशिव यांना थांब्याचा मोठा लाभ होणार.

  • प्रवासाचा कालावधी ७-८ तासांवर, म्हणजे ४ तासांची बचत होणार.

Pune Nanded Vande Bharat Express : पुण्याला आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत पुण्याहून नांदेडला वंदे भारत धावण्याची शक्यता आहे. नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी नांदेड वंदे भारत एक्सप्रेससाठी पाठपुरावा करत केंद्रीय मंत्री अश्वणी वैष्णव यांची भेट घेतली. नांदेड आणि पुणे वंदे भारत एक्सप्रेसबाबत रेल्वे मंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या वर्षाअखेरीस पुणे-नांदेड-पुणे ही वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्याची शक्यता आहे. वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यास नांदेडहून पुण्याला जाणाऱ्या कामगार, विद्यार्थी अन् प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

नांदेड-पुणे या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यास मराठवाडा आणि पुणे यांच्यातील रेल्वे प्रवास अधिक सोप्पा होणार आहे. नांदेड अन् पुणे फक्त सात ते आठ तासांत अतंर पूर्ण होण्याची शक्यता आहे. लातूर, धाराशिव या दोन जिल्ह्यांनाही या वंदे भारत एक्सप्रेसचा फायदा होणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यास प्रवाशांचा वेळ आणि मेहनत वाचेल. रेल्वे मंत्रालय लवकरच याबाबत अधिकृत वेळापत्रक आणि तारखा जाहीर करेल, अशी अपेक्षा आहे. (When will Pune to Nanded Vande Bharat Express start)

नांदेड ते पुणे फक्त ७ तासांत - Pune Nanded Vande Bharat route and stops

नांदेड-पुणे वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यास प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी होईल. ५५० किमी अंतर ही ट्रेन ७-८ तासांत प्रवास पूर्ण करेल, अशी अपेक्षा आहे. नांदेड, लातूर, धाराशिव या मार्गावर यांसारख्या प्रमुख स्थानकांवर थांबे असण्याची शक्यता आहे. वंदे भारतच्या आधुनिक सुविधांमध्ये एसी चेअर कार, हाय-स्पीड वाय-फाय, आरामदायी सीट्स आणि प्रगत सुरक्षा यंत्रणा यांचा समावेश आहे. नांदेड ते पुणे या वंदे भारत एक्सप्रेसचे भाडे साधारण ₹१५००-२००० (चेअर कार) आणि ₹२०००-२५०० (एक्झिक्युटिव्ह क्लास) असण्याची शक्यता आहे. (What is the fare of Vande Bharat Express from Nanded to Pune)

नांदेड-पुणे सध्या प्रवास कसा करता येतो ?

नांदेड (NED) ते पुणे (PUNE) दरम्यान सध्या मोजक्याच ट्रेन सुरू आहेत. त्याही रात्रीच्या वेळेत ट्रेन धावतात. नांदेड-पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस (१२७३०) ही प्रमुख गाडी रात्री ९:३० वाजता नांदेडहून सुटते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ९:०० वाजता पुण्याला पोहोचते. याचा प्रवास कालावधी सुमारे ११-१२ तास आहे. याशिवाय, नांदेड-पनवेल एक्सप्रेस (१७६१४) पुण्याला थांबते, जी संध्याकाळी ५:३० वाजता सुटते आणि सकाळी ६:०० वाजता पुण्याला पोहोचते. या प्रवासाला १२-१३ तास लागतात. या गाड्यांचे भाडे स्लीपर क्लाससाठी ₹४००-५५०, थर्ड एसीसाठी ₹१०००-१३०० आणि सेकंड एसीसाठी ₹१५००-१८०० आहे.

बाय रोड काय स्थिती ? किती वेळ लागतो?

नांदेड ते पुणे हे अंतर रस्त्याने सुमारे ५००-५५० किमी आहे. या प्रवासाला अंदाजे १०-१२ तास लागतात. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ (MSRTC) च्या शिवशाही (एसी), सेमी-लक्झरी आणि सामान्य बस उपलब्ध आहेत. खासगी एसी बससुद्धा या मार्गावर धावतात. या बस पुण्यात स्वारगेट, शिवाजी नगर किंवा वाकड येथे थांबतात. प्रमुख मार्ग NH65 (नांदेड → परभणी → औरंगाबाद → अहमदनगर → पुणे) आणि पर्यायी मार्ग NH52 (नांदेड → लातूर → सोलापूर → पुणे) आहे.

नांदेड वंदे भारत एक्सप्रेस कधी सुरू होणार आहे?

डिसेंबर २०२५ पर्यंत ही एक्सप्रेस सुरू होण्याची शक्यता आहे.

नांदेड-पुणे या वंदे भारत गाडीचे प्रमुख थांबे कोणते असतील?

नांदेड, लातूर, धाराशिव, कुर्डूवाडी, दौंड, पुणे हे थांबे असण्याची शक्यता आहे.

पुण्यातून कोणत्या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सध्या धावतात?

पुण्यातून सध्या कोल्हापूर आणि हुबळी या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस धावतात. त्याशिवाय मुंबईहून सुटणारी सोलापूर एक्सप्रेसही पुण्यात थांबते. आता लवकरच पुण्याहून नांदेड आणि नागपूरसाठी वंदे भारत सुरू होण्याची शक्यता आहे.

नांदेडमधून किती वंदे भारत एक्सप्रेस धावतात?

नांदेडमधून सध्या एकही वंदे भारत एक्सप्रेस धावत नाही. पण ऑगस्ट महिन्यात नांदेड-संभाजीनगर-मुंबई ही वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. त्याशिवाय २०२५ च्या अखेरपर्यंत नांदेड-पुणे वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday : घराच्या जमिनीचे आणि प्रेमाचे प्रश्न सुटणार, वाचा रविवारचे राशीभविष्य

Ind vs Eng, 5th Test, Day 3: जैस्वालचा 'यशस्वी' धमाका, जडेजा, वॉशिंगटनची 'सुंदर' खेळी, भारताचं इंग्लंडला 374 धावांचं आव्हान

Pigeons: मुंबईतील कबुतरखान्यावरून नवा वाद; नेमकं कारण काय? मुंबईत किती आहेत कबुतरखाने?

Raj Thackeray : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हिंदीचा कळवळा; शेकापच्या मेळाव्यातून राज ठाकरेंचा हल्ला, VIDEO

Mumbai Crime : एकनाथ शिंदेंकडे तक्रार केली, तर...; 5 लाखांची खंडणी घेताना माजी नगरसेवकाला रंगेहाथ पकडलं

SCROLL FOR NEXT