Mankoli Bridge Saam Tv
मुंबई/पुणे

Mankoli Bridge: माणकोली पूलाच्या प्रवासात श्रेयवादाचा खोडा! राजू पाटील संतापले; मुख्यमंत्र्यांना ट्वीट टॅग करत म्हणाले...

Kalyan Dombivli News: डोंबिवली ठाण्याला जोडणाऱ्या मोठा गाव माणकोली खाडी पुलाच्या उद्‌घाटनावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील हे आक्रम झाले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

>> अभिजित देशमुख

Mankoli Bridge:

डोंबिवली ठाण्याला जोडणाऱ्या मोठा गाव माणकोली खाडी पुलाच्या उद्‌घाटनावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील हे आक्रम झाले आहेत. सत्ताधारी पक्षातील श्रेयवादामुळे हा पूल जनतेच्या प्रवासाकरीता खुला केला जात नाही.

जनतेच्या प्रवासात श्रेयवादाचा खोडा असल्याचे ट्वीट राजू पाटील यांनी केलं आहे. त्यांनी ट्वीट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना टॅग केलं आहे. या ट्विटमुळे पुन्हा एकदा मोठा गाव माणकोली खाडी पूल चर्चेत आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कल्याण डोंबिवलीकरांना लवकरात ठाणे मुंबई गाठता यावी यासाठी एम एमएमआरडीएमार्फत डोबिवली मोठा गाव ते माणकोली दरम्यान पुलाचे काम सुरू आहे. अवघ्या 20 मिनिटात डोंबिवतीलून ठाणे गाठता येणार आहे. या पूलाचे काम पूर्ण झाले असले तरी हा पूल लोकार्पणनाच्या प्रतीक्षेत आहे. (Latest Marathi News)

हा पूल वाहतुकीसाठी सज्ज आहे. या पूलाच्या लाोकार्पणकरता शिवसेना आणि भाजप या दोन्ही सत्ताधारी पक्षात स्पर्धा असून श्रेयवादासाठी पूलाचे लोकार्पण रखडवून ठेवण्यात आल्याचा आरोप मनसे आमदार पाटील यांनी ट्वीटद्वारे केला आहे. मनसे आमदार पाटील यांनी ट्वीटमध्ये आमदार पाटील यांनी पूल जनतेसाठी बांधला होता की, श्रेयासाठी? असा सवाल उपस्थित केला आहे.

''माणकोली पूलाचे श्रेय बळकावण्यासाठी दोन्ही सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार होड सुरू आहे. राज साहेब म्हणतात तेच खरं आहे. जनतेला राग येत नाही. म्हणून हे सत्ताधारी जनतेला वेठीस धरतात. शासन आपल्या दारी या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री, उपमुख्यमत्री आणि अन्य मंत्री डोंबिवलीत येणार आहेत. तर पूल नागरीकांना खुला करुन जनतेची ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका तरी करा. ज्यांना श्रेय घ्यायचे आहे. त्यांनी घेऊन टाका आणि कृपया आता तरी जनतेला गृहित धरणं सोडा'', असं पाटील म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT