मुंबई: "२०१४ ला खरं स्वातंत्र्य मिळालं असं वाटण्यात गैर काय?" असा सवाल उपस्थित करत भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर (bjp mp pragya singh thakur) यांनी अभिनेत्री कंगणा राणौतचं (kangana ranaut) एकप्रकारे समर्थन केलं आहे. २००८ च्या मालेगांव (Malegaon) बॉम्बस्फोट (Bomb Blast) प्रकरणी त्या न्यायालयात हजर झाल्या होत्या, त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. (whats wrong to think that 2014 got real freedom? - MP Pragya Singh Thakur)
हे देखील पहा -
खासदार प्रज्ञा सिंग ठाकूर म्हणाल्या की, मला कोर्टने बोलावले आणि मी आले नाही असं झालं नाही, उपचार सुरू आहेत, केस सुरू आहे, जेव्हा-जेव्हा न्यायालय बोलवेल तेव्हा न्यायालयात येणार. राजकारणाचे काही मापदंड असतात, हिंदूंचा छळ मांडला जात आहे. मनात श्रद्धा नाही, दुर्भाग्यपूर्ण मनाने ही कारवाई होत आहे असंही त्या म्हणाल्या.
कंगणाच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की, ''स्वातंत्र्य कशाला म्हणतात? आता सर्वपरी विकास होत आहे, २०१४ पासून खऱ्या अर्थाने लोकांना स्वातंत्र्य मिळालं असं लोकांना वाटतं आहे, त्यांनी ते बोलून दाखवलं, त्यात वाईट वाटण्यासारखे काय आहे असं म्हणत त्यांनी एक प्रकारे कंगणाचं समर्थन केलं आहे.
पुढे त्या म्हणाल्या की, राष्ट्रभक्ती व्यक्ती बोलतो तेव्हच प्रश्न उपस्थित केले जातात. आज विकास होत आहे आणि लोक स्वाभिमानाने जगत आहेत, काँगेसच्या काळात केवळ भ्रष्टाचार होता, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय मोदीच घेतात. CAA देशाच्या हिताचे, NRC बिल अजून आलेच नाही त्याला विरोध का ? अर्थचा अनर्थ करू नये असंही त्या म्हणाल्या आहेत.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.