Pune Crime News  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News : पुण्यात चाललंय काय? व्हॉट्सअॅप ग्रुपमधून रिमूव्ह केल्याने अ‍ॅडमिनची जीभच कापली

व्हॉट्सअप ग्रुपमधून रिमूव्ह केल्यामुळे ग्रुप अॅडमिनची जीभ कापल्याची धक्कादायक घटना पुण्यातील फुरसुंगी येथे उघडकीस आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pune Crime News : पुण्यात कोणताही गुन्हा करताना आता पोलिसांचा धाक उरला नाही का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कुठे कोयता गॅंगची दहशत तर कुठे भर दिवसा गोळीबार.

आता तर हद्दच पार झाली असं म्हणावं लागेल. कारण पुण्यातील फुरसुंगी भागात व्हाट्सअप ग्रुप मधून काढल्याच्या वादातून एकाला बेदम मारहाण करत जीभ कापल्याची धक्कदायक घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील फुरसुंगीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सोसायटीतील सदस्यांनी काढलेल्या व्हॉट्सअप ग्रुपमधून रिमूव्ह केल्यावरून बाचाबाची झाल्यानंतर पाच जणांनी ग्रुप अ‍ॅडमिनला बेदम मारहाण केल्याची घटना घडली.

मारहाणीत या टोळक्याने अ‍ॅडमिनची जीभच कापली आहे. त्यांच्या जीभेला टाके पडले असून, यात ते गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 28 डिसेंबर रोजी घडला आहे.

सोसायटीतील रहिवाशी असणाऱ्या व्यक्तींचा तक्रारदारांच्या पतीने "ओम हाईट्स ऑपरेशन" या नावाने व्हॉट्सअप ग्रुप तयार केला होता. त्यात सर्व सदस्य ही होते. तक्रारदार यांचे पती या ग्रुपचे अ‍ॅडमिन होते.

दरम्यान, त्यांनी यातील एका व्यक्तीला जो याप्रकरणात आरोपी आहे. त्या ग्रुपमधून रिमूव्ह म्हणजे काढून टाकले.

या गोष्टीचा त्यांनी तक्रारदारांच्या पतीला विचारणा केली. मात्र त्यांना काही उत्तर मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी तक्रारदारांच्या पतीला फोन करून भेटायचे आहे, असे सांगून भेटण्यास बोलावले.

त्यावेळी ग्रुपमध्ये कोणीही कसलेही मेसेज करत असल्याने ग्रुपच बंद केला असल्याचे सांगितले, असता आरोपीने पाच जणांसोबत येऊन तक्रारदारांना मारहाण केली. त्यांच्या तोंडावर बुक्की मारली, या बुक्कीचा फटका इतका जोरात होता की दातासह जिभेवर त्याचा मार लागला यात ते जखमी झाले असून त्यांच्या जिभेला टाके पडले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी अदखल पात्र गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black Panther: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पहिल्यांदाच दिसला ब्लॅक पँथर; पाहण्यासाठी पर्यटकांची उत्सुकता वाढली| VIDEO

Trendy Mangalsutra Designs: ऑफिसमध्ये फॉर्मल ड्रेसवर ट्राय करा हे ७ ट्रेंडी लेटेस्ट नाजूक मंगळसूत्र डिझाइन्स

Maharashtra News Live Update: बीडच्या आष्टी तालुक्यात धक्कादायक प्रकार, शेतकऱ्याने बांध पेटवून दिला

Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कुणाला देणार संधी, 'या' ६ नेत्यांची नावं चर्चेत

Happy Birthday Sachin: १०० कोटींचा बंगला, ३५ कोटींच्या गाड्या, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरची एकूण संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT