Eknath Shinde  saam tv
मुंबई/पुणे

संजय राऊतांकडील नोटांच्या पाकीटावर तुमचं नाव कुठून आलं?; एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

नोटांच्या पाकिटावर आपलं नावं कसं आलं? याबाबत एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

पुणे : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना रविवारी रात्री ईडीने अटक केली. सोमवारी त्यांना ईडीच्या विशेष कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने राऊत यांना ४ ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावली. संजय राऊत यांच्या घरी केलेल्या छाप्यात ईडीने जवळपास ११ लाखांची रोख रक्कम हस्तगत केली. या नोटांच्या पाकिटावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नावाचा उल्लेख होता. दरम्यान, या नोटांच्या पाकिटावर आपलं नावं कसं आलं? याबाबत एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे. (CM Eknath Shinde News)

संजय राऊतांच्या घरी सापडलेल्या पैशांवर तुमचं नाव असून शिवसेनेकडून चौकशीची मागणी होत असल्याचं एकनाथ शिंदेंना सांगण्यात आलं. यावर ते म्हणाले "माझी चौकशी करण्यापेक्षा, ज्यांच्या घरात पैसे सापडले आहेत त्यांची चौकशी झाली पाहिजे". संजय राऊतांची चौकशी सुरु असून जे काही सत्य असेल ते समोर येईल.

नोटा कुणाच्या घरी सापडल्यात त्यावर माझं नाव कुणी लिहलं असेल?. याबाबत राऊतांनाच विचारा, पैसे कुठून आले? त्यावर नाव कुणी लिहलं? पैशांबाबत तेच सांगू शकतील असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विषयावर बोलण्याचं टाळलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हडपसर भागात पालिकेच्या जागेवर बांधण्यात आलेल्या उद्यानाचं उद्घाटन करण्यात येणार होतं. पण या उद्यानाला एकनाथ शिंदे यांचं नाव देण्यात आल्याने वाद निर्माण झाला आणि ऐनवेळी कार्यक्रम रद्द करावा लागला. (Eknath Shinde Latest News)

१० लाखांच्या रकमेवर शिंदेंचं नाव

रविवारी रात्री ईडीने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या बंगल्यावर धाड टाकली. सकाळी सातच्या सुमारास ‘ईडी’चे अधिकारी त्यांच्या भांडूप येथील बंगल्यावर दाखल झाले. याशिवाय ईडीकडून दादर येथील गार्डन कोर्ट इमारतीतही शोधमोहीम राबवण्यात आली.

नऊ तास चाललेल्या या चौकशी आणि छापेमारीदरम्यान राऊत यांच्या घरी साडेअकरा लाखांची रोख रक्कम सापडली. यामधील १० लाखांची रक्कम असणाऱ्या पाकिटावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव असून ‘एकनाथ शिंदे अयोध्या’ असा उल्लेख असल्याची माहिती आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सुरतच्या उधना रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची दीड किलोमीटर लांब रांग

Viral Fever: दिवाळीनंतर वायरल तापाचा धोका वाढतो? जाणून घ्या कारण

Raigad Crime: सोशल मीडियावरच्या प्रेमासाठी तोडली सात वचनं; प्रियकर आणि मैत्रिणीच्या मदतीने काढला पतीचा काटा

Maharashtra Politics: निवडणुकीआधीच राजकारण तापलं, स्वबळाचा नारा, उदय सामंतांचा मित्रपक्षाला इशारा

Diwali Abhyang Snan Positivity: अभ्यंगस्नान करताना अंघोळीच्या पाण्यात टाका या वस्तू, शरीरात दिसतील चांगले बदल

SCROLL FOR NEXT