Mumbai Railway Local News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Railway : मुंबई रेल्वेचा मोठा निर्णय! प्रवाशांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी 'तिसरा डोळा'; नेमकं प्रकरण काय?

Mumbai Railway Local News : मुंबई लोकलमधील वाढत्या हिंसाचार आणि तिकीट वादांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने ३७ स्थानकांवर २०० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

Alisha Khedekar

  • मुंबई लोकलमधील सुरक्षेसाठी पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय

  • ३७ स्थानकांवर २०० ठिकाणी CCTV कॅमेरे बसवले जाणार

  • प्रकल्पासाठी २५.८१ कोटींची गुंतवणूक

  • तिकीट वाद, धमक्या आणि हिंसाचार रोखण्यास मदत

मुंबईत काही दिवसांपूर्वी भरदिवसा एका प्राध्यपकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात प्राध्यपकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच मुंबई लोकलमधून प्रवास करताना तिकिटांमध्ये देखील अनेक प्रवासी घोळ करत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या पश्चिम रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे.

पश्चिम रेल्वेने मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कवरील ३७ स्थानकांवर २०० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास सुरुवात केली आहे. ही सीसीटीव्ही यंत्रणा रेल्वेच्या दक्षता विभागालाही तिकीट तपासणी प्रक्रियेवर बारकाईने नजर ठेवण्यास मदत करणार आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, तिकीट कार्यालये, बुकिंग काऊंटर आणि प्रवाशांशी थेट संपर्क येणाऱ्या ठिकाणी सुमारे २५.८१ कोटींची सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात येत आहे.

हा खर्च बुकिंग आणि तिकीट काढणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित कामकाजाचे वातावरण निर्माण करण्यासाठी करण्यात येत आहे. गर्दी, भाड्याविषयक वाद आणि तिकीट नसल्यामुळे दंड आकारताना होणारे वाद, विशेषतः गजबजलेल्या उपनगरी मार्गांवर या कर्मचाऱ्यांना अनेकदा आक्रमक वर्तनाला सामोरे जावे लागते.

कुठे कुठे बसवले जाणारा सीसीटीव्ही कॅमेरे

१. PRS आणि UTS-कम-PRS केंद्रे:

२९ प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS) केंद्रे आणि ३१ अनारक्षित तिकीट प्रणाली (UTS)-कम-PRS स्थानकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. यासाठी ७.१२ कोटी खर्च करण्यात येणार आहे. यामुळे सर्वाधिक गर्दी असलेल्या तिकीट केंद्रांवरील सुरक्षा वाढणार आहे.

२. UTS स्थानके:

एकूण ६८ UTS स्थानकांमध्ये सीसीटीव्ही कव्हरेज देण्यात येणार आहे. यासाठी १२.३९ कोटी खर्च होणार आहे. अधिकाऱ्यांच्या मते, यामुळे तिकीट न काढता प्रवास करणे, धमक्या, शिवीगाळ आणि दमदाटी यांसारख्या घटनांना आळा बसेल. विशेषतः रोख रक्कम हाताळणाऱ्या बुकिंग क्लार्कसाठी ही बाब महत्त्वाची ठरणार आहे.

३. TC कार्यालये आणि TTE लॉबी:

याशिवाय,४० TC कार्यालये आणि TTE लॉबींमध्ये सुमारे ६.३० कोटी खर्चून सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. उशिरा रात्री आणि गर्दीच्या वेळेत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेत वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Death: अजित पवारांबद्दल तुम्हाला या गोष्टी माहिती आहेत का?

Toe Rings Design: नव्या नवरीसाठी जोडव्यांच्या सुंदर आणि नाजूक 5 डिझाईन्स

Face Yoga Benefits: फेस योगा करण्याचे फायदे काय? कधी करावा फेस योगा?

Maharashtra Live News Update: गडचिरोलीत शासकीय आश्रम शाळेतील तब्बल ७० विद्यार्थ्यांना विषबाधा

विमान कसं आणि कुठं कोसळलं?...बारामती एअरपोर्टवर हेलिकाॅप्टरमधून उतरताच शरद पवारांचा पहिला प्रश्न

SCROLL FOR NEXT