Pune Rain : दोन दिवसांच्या विश्रातीनंतर पुण्यात (Pune Rain) मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. शहरातील मध्यवर्ती भाग नारायण पेठ, सदाशिव पेठ, स्वारगेट, नवी पेठ यासह कात्रज, कोंढवा, कर्वेनगर परिसरात पावसाच्या (Rain) जोरदार सरी कोसळत आहेत. अचानक पावसाला सुरूवात झाल्याने पुणेकरांची तारांबळ उडाली. (Pune Rain Latest News)
दरम्यान, पुढील दोन ते तीन तासांत पुण्यात मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पुण्यात 19 ऑक्टोबरपर्यंत वादळ आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो, असे हवामान तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे पुणेकरांच्या दिवाळीच्या खरेदीचं नियोजन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. (Breaking Marathi News)
पुण्यात दोन तासांपासून मुसळधार पाऊस
पुण्यात गेल्या २ तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे अनेक ठिकाणचे रस्ते जलमय झाले असून सगळीकडे पाणीच-पाणी साचलं आहे. शहरातील फुरसुंगी, उरुळी देवाची परिसरात विजेच्या कडकडाटसह जोरदार पाऊस सुरू आहे. यासोबतच बाणेर-बालेवाडी भागातही जोरदार पाऊस आहे.
अनेक भागातील वीजपुरवठा खंडित
पावसामुळे बिबवेवाडी परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला असून गावठाण सह परिसरातील लाइट गेल्या पंधरा मिनिटापासून बंद पडला आहे. पावसाचे पाणी रस्त्यावर आल्याने बिबवेवाडी कडून अप्पर कडे जाणारी वाहतुक ठप्प झाली आहे. इंदिरा नगर, महेश सोसायटी चौकात मोठय़ा प्रमाणात पाणी आले आहे. (Maharashtra News)
पुण्यात पावसाचा जोर वाढणार
बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे पुण्यासह राज्याच्या दक्षिण भागात काही दिवस पावसाची शक्यता वाढेल, असंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. पुण्यात 17 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर दरम्यान पुण्यात गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.