Mumbai Weather Update Saam Tv
मुंबई/पुणे

Weather Update : मुंबई देशातील सर्वात उष्ण शहर; डिसेंबरमध्येही थंडी नाही

तापमानात वाढ झाल्याने उष्णतेने नागरिकांचे हाल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai Weather Update - महाराष्ट्रावर मेंडोस चक्रीवादळाचा मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. थंडीचा सर्वात जोर असलेला डिसेंबर महिना अर्धा संपला आहे. मात्र, मुंबईमध्ये (Mumbai) ऑक्टोबर हिट प्रमाणे डिसेंबर हिट सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. डिसेंबरमध्ये मुंबईच्या तापमानात वाढ झाले आहे.

देशातील सर्वात जास्त तापमानाची नोंद मुंबईत झाली आहे. मुंबईत २ दिवसांपूर्वी ऐन थंडीत 35.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. हे देशातील सर्वाधिक तापमान असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. हवामान खात्यानुसार, संपूर्ण महाराष्ट्रात मुंबईत सर्वाधिक उष्मा जाणवत आहे. तापमानात वाढ झाल्याने उष्णतेने नागरिकांचे हाल होत आहेत.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 7-8 दिवस मुंबईच्या तापमाणात आणखी वाढ होणार आहे. डिसेंबर महिना सुरु होऊन देखील मुंबईकरांना थंडीची प्रतीक्षा करावी लागत आहे.पुढच्या 7-8 दिवस मध्य भारतात महाराष्ट्र सहीत कमाल तापमान वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

यामध्ये कोकण मुंबई, ठाणे 34 अंश सेल्सिअस च्या आसपास राहण्याची शक्यता. २ दिवसांपूर्वी ऐन थंडीत मुंबईत 35.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यात देखील तापमानात वाढ झाली आहे. पुण्यात 32.3, नाशिक 31.5, डहाणू 31.8 आणि रत्नागिरी 35.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Janhvi Kapoor: नवरी नटली! जान्हवी कपूरचा नवा ब्रायडल लूक पाहिलात का?

CP Radhakrishnan : सी. पी. राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती; 'इतक्या' संपत्तीचे आहेत मालक

Girls Education: उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना दरमहा २ हजार! लगेचच जाणून घ्या योजनेची संपूर्ण माहिती

Vice President Election: सीपी राधाकृष्णन भारताचे १७ वे उपराष्ट्रपती, इंडिया आघाडीचे सुदर्शन रेड्डी पराभूत

Asia Cup 2025 : संजू सॅमसनचं काय होणार? कॅप्टन सूर्यकुमार यादवने दिलं कडक उत्तर, अशी असेल भारताची प्लेइंग इलेव्हन

SCROLL FOR NEXT