Rain Alert in Maharashtra  Saam TV
मुंबई/पुणे

Weather Forecast : मुंबईसह राज्यातील 'या' भागात आज मुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून अनेक जिल्ह्यांना अलर्ट

Rain Alert in Maharashtra : मुंबई पुण्यासह, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्गात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Satish Daud

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा मान्सून वेळेआधीच महाराष्ट्रात दाखल झाला. कोकण किनारपट्टी आणि मुंबईत धडकल्यानंतर मान्सूनने विदर्भ आणि मराठवाड्याकडे आपला मोर्चा वळवला. मात्र, विदर्भातील काही भागात पोहचल्यानंतर मान्सूनची चाल थबकली आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. विदर्भ-मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना अद्याप पावसाची प्रतिक्षा आहे.

अरबी समुद्रातील वाऱ्यांचा वेग मंदावल्याने मान्सूनचा प्रवास संथ गतीने सुरू असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे. येत्या २० जूननंतर मान्सून पूर्णपणे सक्रिय होऊन राज्यात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यात आज (ता. १६) तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई पुण्यासह, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्गात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

याशिवाय उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होऊ शकतो. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पावसाबरोबरच वादळी वारे देखील वाहण्याचा अंदाज आहे. वाऱ्यांचा वेग 30-40 किमी प्रतितास असू शकतो, असं आयएमडीने सांगितलं आहे. दरम्यान, येत्या २४ तासांत धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांतही पावसाचा जोर वाढेल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panvel Tourism : फॅमिली ट्रिपसाठी पनवेलजवळील सुंदर लोकेशन, वीकेंडला 'येथे' होते पर्यटकांची गर्दी

Maharashtra Live News Update: महिलांच्या डब्यात बुरखा घालून फिरणारी व्यक्ती रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

Thursday Horoscope: कामाच्या ठिकाणी राहा सावध, 5 राशींची होणार चांदीच चांदी; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Navi Mumbai: पाढे पाठ नसल्याने दिली भयंकर शिक्षा, शिक्षिकेने विद्यार्थिनीला उलाथन्याने दिले ४० फटके

अजित पवारांच्या प्रेमकोर्ट बंगल्यावरील विलीनीकरणाच्या चर्चेत सुनील तटकरेही? खरं काय आणि खोटं काय? VIDEO

SCROLL FOR NEXT