Maharashtra Rain Alert Saam TV
मुंबई/पुणे

Weather Forecast : मान्सूनबाबत हवामान खात्याची मोठी अपडेट; महाराष्ट्रात आज कुठे कुठे कोसळणार पाऊस?

Satish Daud

नैऋत्य मौसमी पावसाने आपला पुढचा प्रवास सुरू ठेवला आहे. मुंबईत दाखल झाल्यानंतर मान्सूनने आता हळुहळु संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. पुढील २४ तासांतही राज्यात पावसाची बॅटिंग सुरू राहील, असं भारतीय हवामान खात्याने सांगितलं आहे.

या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगडमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूसह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

मुंबईत दाखल झाल्यानंतर मान्सूनने विदर्भाकडे कूच करण्यास सुरुवात केली. सोमवारपर्यंत मौसमी वाऱ्यांनी निम्मा महाराष्ट्र व्यापला होता. मंगळवारी (ता. ११) मान्सून अकोला, पुसद येथे पोहोचल्‍याची घोषणा हवामान खात्‍याने केली. त्यामुळे पुढील ३ दिवसांत विदर्भातील अनेक जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

अमरावती, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, वर्धा, आणि अकोला जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळतील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. दुसरीकडे नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव परभणी जिल्ह्यांत देखील विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

यादरम्यान वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किमी असू शकतो. त्यामुळे वादळाच्या स्थितीत नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. वीज चमकत असताना मोबाईलचा वापर करू नये तसेच झाडाखाली थांबू नये. घरातील विजेची उपकरणे बंद ठेवावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND-W vs NZ -W: टीम इंडियाच्या फलंदाजांचा फ्लॉप शो! पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून दारुण पराभव

Pune News: पुण्याचं बदलापूर होतंय, वाचा स्पेशल रिपोर्ट...

MIM महाविकास आघाडीत सहभागी होणार? कोणत्या भागातून मागितल्या जागा? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मराठा आंदोलकांचे गुन्हे मागे घ्या, एसआयटी रद्द करा; काँग्रेस आमदारांची सरकारकडे मागणी

Healthy Relationship साठी या सोप्या ट्रिक्स करा फॉलो...

SCROLL FOR NEXT