Maharashtra Rain Alert Today 8 July 2023 Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Weather Alert: मुंबईसह पुण्यात मुसळधार पावसाचा अंदाज; कोकणाला रेड अ‍ॅलर्ट, राज्यात कसा असेल पाऊस?

Maharashtra Rain News: येत्या २४ तासांत राज्यात पावसाचा जोर वाढणार असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Satish Daud

Maharashtra Rain Updates: सध्या राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईसह उपनगर, ठाणे, नवी मुंबई परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. याशिवाय कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. अशातच येत्या २४ तासांत राज्यात पावसाचा जोर (Weather Updates)  वाढणार असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

हवामान विभागाने कोकणाला रेड अलर्ट जारी केला असून काही भागात पावसाचा ऑरेंज आणि यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाचे कमबॅक झालं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळत असून यंदा काही अंशी दुबार पेरणीचे संकट टळले आहे.

या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

हवामान खात्याने आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता वर्तवली आहे. कोकणाला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सिंधुदुर्गमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात पावसाचा जोर वाढणार

याशिवाय पालघर, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि कोल्हापूर विदर्भातील गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच सातारा आणि ठाणे जिल्ह्यातही पावसाचा ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे.

येत्या २४ तासांत मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलं आहे. वीज कोसळण्याची भिती असल्याने झाडाखाली उभे राहू नका, असं देखील सांगण्यात आलं आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पत्रकारांना शिवीगाळ, धमकी देणारे खासदार संजय दिना पाटील नरमले; दिलगिरी व्यक्त केली, नेमकं काय घडलं? सर्व सांगितलं

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

Maharashtra News Live Update: संजय दिना पाटील यांच्या विधानाच्या निषेधार्थ धुळ्यात जोडो मारो आंदोलन

Paasport Fees : पासपोर्ट काढणं महागलं! केंद्र सरकारनं वाढवली फी, आता किती रुपये मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT