Rain News Today in Maharashtra Saam TV
मुंबई/पुणे

Weather Alert : महाराष्ट्रासह देशातील ५ राज्यांना आज अतिमुसळधार पावसाचा इशारा; हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी

Maharashtra Weather Update 21th July 2024 : आयएमडीने महाराष्ट्रासह देशातील ५ राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला असून रेड अलर्ट देखील जारी केला आहे. नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Satish Daud

सध्या संपूर्ण देशभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातही पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. मुंबई, पुण्यासह, मराठवाडा तसेच विदर्भात जोरदार पाऊस पडत आहे. अशातच येत्या २४ तासांत पावसाचा जोर आणखीच वाढणार, असा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला.

आयएमडीने देशातील ५ राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा (Maharashtra Heavy Rain Alert) दिला असून रेड अलर्ट देखील जारी केला आहे. नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र, उत्तराखंड, गुजरात, गोवा आणि छत्तीगडमध्ये येत्या काही तासांत पावसाचा जोर आणखीच वाढण्याची शक्यता आहे.

याशिवाय मध्य आणि पश्चिम भारतातील अनेक भागातही जोरदार पावसाची शक्यता आहे. या भागात हवामान खात्याने पावसाचा ऑरेंज अलर्ट (Weather Update Orange Alert) जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातही मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा वाढला आहे.

महाराष्ट्रात कुठे-कुठे कोसळणार पाऊस?

हवामान खात्याने मुंबई, पुण्यासह, ठाणे, पालघर तसेच रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मराठवाडा आणि विदर्भातही काही जिल्ह्यातही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, अकोला, चंद्रपूर, गोंदिया आणि वाशिम जिल्ह्याला पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि बीड जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. एकंदरीत संपूर्ण राज्यात २४ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज म्हणजेच २१ जुलै रोजी सर्व शहरांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. रायगडमध्ये २१-२३ जुलैपर्यंत, रत्नागिरीत २१ आणि २२ जुलैला रेड देण्यात आलाय. २२ जुलै रोजी सिंधुदुर्गात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

SCROLL FOR NEXT