मुंबई: राज्यात भोंग्यांच्या राजकारणाचा कल्लोळ पहायला मिळतोय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या भाषणात मशिदीवरील भोंग्यावर (Loudspeaker) आक्षेप नोंदवला होता, सोबतच हे भोंगे हटवले गेले नाही तर "मशिदींसमोर (Masjid) आणि मंदिरात भोंगे लावत हनुमान चालीसा लावा" असं आवाहन राज ठाकरेंनी (Raj Thackeray) केलं होतं. त्यानुसार मनसे कार्यकर्त्यांनी घाटकोपर येथे मनसे-विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांच्या कार्यालयावर स्पीकरवर हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) लावली होती. राज ठाकरेंच्या या आवाहनाला भाजपचंही समर्थन आहे. भाजप नेते मोहित कंबोज-भारतीय (Mohit-Kamboj Bhartiya) यांनी आता हनुमान चालीसा वाजवण्यासाठी मोफत भोंगे वाटप करणार असल्याचं जाहिर केलं आहे. ("Play the Hanuman Chalisa, we will give free Loudspeakers" - Mohit Kamboj's appeal)
हे देखील पहा -
भाजप नेते मोहित कंबोज-भारतीय म्हणाले की, "मंदिरावर हनुमान चालिसा यासाठी भोंगे आम्ही देवू ज्यांना लावायचे आहेत त्यांना ! हिंदु एकता आवाज आलाच पाहिजे ! जय श्री राम ! हर हर महादेव !" असं ट्विट (Tweet) त्यांनी केलं आहे. तसेच त्यांनी मशीदीवरील अनधिकृत लाऊडस्पीकर काढावे अशी मागणी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याकडे केली होती.
दरम्यान राज ठाकरेंच्या या आवाहनानंतर मविआ नेते राज ठाकरेंना निशाण्यावर धरत आहेत. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले होते की, "तुम्ही कोणत्याही मदरशांमध्ये कधीही जा, तुम्हाला दाढी करायचा वस्तारा जरी सापडला तरी मी राजकारण सोडेन" असं खुलं आव्हान मंत्री आव्हाड यांनी राज ठाकरे यांना केलं होतं.
त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनीही राज ठाकरेंवर टीका करत म्हटलं होतं की, "राज ठाकरे (Raj Thackeray) यांना विनंती आहे तूम्ही शरद पवारांचा इंटरव्यू घ्या, संपुर्ण पक्ष भाड्याने लावून दुसऱ्याच्या प्रचाराला फिरा, पण तुमचा संपलेला पक्ष हिंदु-मुस्लिम दंगलीवर उभा करु नका." तसेच "माझा राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा 100 टक्के पाठींबा आहे. फक्त आमचं एकच म्हणणं आहे अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना तिकडे हनुमान चालीसा म्हणायला पाठवा. मला एकही बहुजन पोरगा तिथं नको आहे. जितकी पोरं हनुमान चालीसा म्हणायला जाणार आहेत त्यांनी शर्ट काढून जानवं दाखवा एकही बहुजन पोरगा तिथं नको आहे." अशी खोचक टीका त्यांनी केली होती.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.