कल्याणमध्ये 36 लाखांची पाणी चोरी; MIDC ने केला गुन्हा दाखल
कल्याणमध्ये 36 लाखांची पाणी चोरी; MIDC ने केला गुन्हा दाखल प्रदीप भगणे
मुंबई/पुणे

कल्याणमध्ये 36 लाखांची पाणी चोरी; MIDC ने केला गुन्हा दाखल

प्रदीप भणगे

कल्याण : मलंग रोडवरील (malang road kalyan) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) जलवाहिनीतून (water pipeline) बेकायदेशीररीत्या नळ जोडणी करून पिण्याचे पाणी चोरी करणाऱ्या दोन मोठया सोसायटींवर एमआयडीसीच्या उपअभियंत्यांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे अनधिकृत कनेक्शन घेत पाणी चोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. (water theft in Kalyan, MIDC filed a case)

हे देखील पहा -

मलंग रोडवर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची 1200 मिलिमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी आहे. या जलवाहिनीतून अनेक ठिकाणी अनधिकृतपणे पाणी कनेक्शन घेत पाणी चोरी होत असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. मलंग रोडवरील अडीवली ढोकली येथील निर्मला पार्क सोसायटीने जून 2016 ते ऑगस्ट 21 पर्यंत आणि शिवशाही इनक्लेव बिल्डींग सोसायटीने फेब्रुवारी 2020 पासून ते ऑगस्ट 21 पर्यंत बेकायदेशीररीत्या नळ जोडणी करून सुमारे 36 लाख रुपये किमतीचे पाणी चोरी केल्याचे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या भरारी पथकाच्या निदर्शनास आले.

या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात दोन्ही सोसायट्यांच्या विरोधात पाणी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे आणि पोलीस यात अजून कोण आरोपी आहेत का, याचा शोध घेत आहेत. तसेच यांना नळजोडणी कोणी करून दिली याचा तपास आम्ही घेत आहोत असे डोंबिवलीचे एसीपी जय मोरे यांनी सांगितले.

Edited y By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Street Food: मुंबईतील 'हे' स्ट्रीट फूड पुरवतील तुमच्या जिभेचे चोचले

Dombivali News : चोरी करून उत्तर प्रदेशात बांधला आलिशान बंगला; दोन सराईत चोरट्याना अटक

Diabetes Health: मधुमेह असणाऱ्यांनी रिकाम्या पोटी खाऊ नका हे पदार्थ, अन्यथा होईल नुकसान

Kolhapur News: मतदानाच्या रांगेत उभ्या असलेल्या वृद्ध मतदाराचा मृत्यू! हार्टअटॅकमुळे जागीच कोसळले

Dhanashri Kadgaonkar : वहिनीसाहेबांचा फिटनेससाठी निर्धार

SCROLL FOR NEXT