Ulhasnagar Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Ulhasnagar Crime News: पाणीपुरवठा विभागाची पाण्याची टाकी बनली दारुड्यांचा अड्डा; नागरिकांकडून कारवाईची मागणी

साम टिव्ही ब्युरो

अजय दुधाणे, उल्हासनगर

Ulhasnagar:

उल्हासगरमधील गुन्हेगारीच्या घटना सातत्याने वाढतायत. उल्हासनगर ४ कुर्ला कँप येथे पाण्याच्या टाकीखाली गार्डन बांधण्यात आले आहे. मात्र या गार्डनचा वापर नागरिक कमी आणि रात्रीच्यावेळी मद्यपी दारू पिण्यासाठी जास्त करताना दिसतायत.

उल्हासनगरच्या कॅम्प नंबर ४ येथील कुर्ला कॅम्प परिसरात पाणीपुरवठा विभागाची पाण्याची टाकी आहे. त्या खाली तेथील माजी नगरसेवकांनी नागरिकांसाठी एक गार्डन बांधले होते. मात्र त्याचा वापर दारू पिण्यासाठी मद्यपी आणि गर्दुले जास्त करताना दिसतायत.

स्थानिक नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाकडे टाकी खाली गेट लावण्यासाठी विनंती केली आहे. मात्र महानगरपालिका पाणी पुरवठा विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. दारू पिऊन येथे कोणताही अनुचित प्रकार घडू शकतो अशी भीती येथील स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

उल्हासनगरमध्ये गुन्हेगारी इतकी वाढली आहे की, अगदी दिवसाढवळ्या देखील चोरीच्या घटना घडतायत. उल्हासनगरात दिवाळीच्या खरेदीसाठी गेलेल्या महिलेची पर्स चोरीला गेल्याची घटना घडली आहे. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. उल्हासनगर कॅम्प दोनमधील गजानन मार्केट परिसरात निकिता चूक या महिला आपल्या मैत्रिणी आणि मुलांसोबत दिवाळीच्या खरेदीसाठी आल्या होत्या.

मात्र मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने निकिता यांच्या पिशवीमध्ये ठेवलेली पर्स लंपास केली. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस आता सीसीटीव्हीच्या आधारे या चोरट्यांचा शोध घेत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

SCROLL FOR NEXT