Water Shortage in Mumbai, Pune Dam May Lead in Water Cut Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai-Pune Water Cut: मुंबई, पुण्यावर पाणीकपातीचं संकट; गेल्यावर्षीच्या तुलनेत धरणांमध्ये किती पाणीसाठा शिल्लक?

प्रविण वाकचौरे

Mumbai, Pune Water Supply Issue:

मुंबई, पुण्यातील नागरिकांना येत्या काळात पाणीकपातीचा सामना करावा लागू शकतो. कारण मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत १८ दिवसांचा कमी पाणीसाठा आहे. तर पुण्यातील धरणांमध्ये फक्त ६७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

मुंबईत सध्या ठिकठिकाणी मोठमोठ्या जलवाहिन्या फुटण्याच्या व त्यामुळे लाखो लिटर पिण्याच्या पाण्याची नासाडी होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुंबईत १८ दिवस कमी पाणीसाठी

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या परिसरात यंदात चांगला पाऊस पडला आहे. मात्र बाष्पीभवन, पाणी चोरी, पाईपलाईन फुटणे आणि गळती यामुळे पाणीसाठा गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी आहे.

गेल्यावर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठी तब्बल १८ दिवसांनी कमी आहे. त्यामुळे मार्च, एप्रिलपासून ते पावसाळा सुरू होईपर्यंत मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागू शकतो. (Latest News Update)

पुण्यातील धरणांमध्ये ६७ टक्के पाणीसाठा शिल्लक

पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये फक्त ६७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत ६० टीएमसी कमी आहे. पुणे जिल्ह्यातील २६ धरणांमध्ये मिळून आजअखेरपर्यंत फक्त १३३.१२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. सध्याच्या उपयुक्त पाणीसाठ्याचे हे प्रमाण एकूण पाणीसाठ्याच्या तुलनेत ६७.११ टक्के इतके आहे.

गेल्या वर्षीच्या आजच्या तारखेला जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण १९३.४२ टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध होता. गेल्या वर्षीच्या या उपलब्ध पाणीसाठ्याचे प्रमाण हे ९७.५१ टक्के इतके होते. त्यामुळे यंदाचा आजअखेरचा उपलब्ध पाणीसाठा हा गेल्या वर्षीच्या तुलनेत ३०.४० टक्क्यांनी कमी झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT