water scarcity in villages of shahapur saam tv
मुंबई/पुणे

Water Shortage In Shahapur : शहापूर तालुक्यात विहिर अधिग्रहणचे प्रस्ताव पडलेत धुळखात, महिलांची पाण्यासाठी भटकंती

एक हंडा कळशी भरण्यासाठी अर्धा तास लागत असल्याने महिला भगिनींना तारे वरची कसरत करावी लागत आहे.

Siddharth Latkar

- फैयाज शेख

Shahapur News :

ठाणे जिल्ह्यातील मुख्यमंत्र्याच्या कर्मभुमितील शहापुर तालूक्यात पावसाने रजा घेऊन दोन महिने झाले नाही ताेच या तालुक्यातील अनेक गावांत वाडी वस्तीमधील ग्रामस्थांना पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. या तालुक्यातील 30 टक्के गावांत टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. (Maharashtra News)

शहापुर तालुक्यातील अनेक गावांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याचे विदारक चित्र पाहण्यास मिळत आहे. या तालुक्यातील गावागावांत दरवर्षी पाचवीला पुजलेली पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची झळ यावर्षी बसू लागली आहे.

या तालुक्यातील 30 टक्के गावांत टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. काही गावांत विहिरीचे अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव धुळखात पडला आहे. फुगाळा, आघणवाडी गावांत दसऱ्यापासून पाणी टंचाईच्या झळा सुरु झाल्या आहेत. या गावांत असलेल्या 2 विहिरींनी तळ ठोकला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

स्थानिक गावकऱ्यांनी गावापासून दोन किलोमीटर दुरवर एका डोंगराच्या कपारी खाली पाझर सुरु असलेल्या डबक्यातून पाणी गोळा करण्याचे काम सुरु केले आहे. गावातील महिला ,वृद्ध, लहान मुली 2 किलोमीटर दरी खोऱ्यातून पायी प्रवास करीत सकाळी सहापासुन् या डबक्याच्या ठिकाणी पाण्यासाठी रांगा लावतात. एक हंडा कळशी भरण्यासाठी अर्धा तास लागत असल्याने महिला भगिनींना तारे वरची कसरत करावी लागत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jannat Zubair Attack: प्रसिद्ध अभिनेत्री आणि भावावर पनवेलमध्ये हल्ला? सोशल मीडियावरील ती पोस्ट व्हायरल

Maharashtra Live News Update: चिपळूणमध्ये प्रदूषणाच्या मुद्द्यावरून प्रदूषण कार्यालयात नागरिकांची धडक

प्रशासनात पुन्हा फेरबदल; बड्या IAS अधिकाऱ्याची अचानक बदली, कुठे होणार नियुक्ती?

Nagpur : १२ वीच्या विद्यार्थ्याची मॉलच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या; परिसरात खळबळ

Saibaba Temple: साईबाबा मंदिराच्या भक्तनिवासाचा स्लॅब कोसळला, ७ जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT