Thane, Water Supply Saam TV
मुंबई/पुणे

Thane Water Supply : ठाणेकरांना दिलासा! पाणीकपातीचं संकट टळलं

Thane News : जलसंपदा विभागाच्या निर्णयामुळे ठाणेकरांना मोठा दिलासा

अजय दुधाणे

Thane Water Supply News : बारवी धरणात यंदा मार्च महिन्याअखेर ५० टक्के पाणीसाठा शिल्लक असून त्यामुळं यंदा ठाणे जिल्ह्यात कोणतीही पाणीकपात न करण्याचा निर्णय जलसंपदा विभागानं घेतला आहे. त्यामुळं ठाणे जिल्ह्यावरील पाणीकपातीचं संकट यंदाच्या वर्षी टळलं असून नागरिकांना यामुळे दिलासा मिळणार आहे. (Latest Marathi News)

बारवी धरणातून संपूर्ण ठाणे (Thane) जिल्ह्याला पाणीपुरवठा केला जातो. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी मीरा भाईंदर, डोंबिवली, उल्हासनगर या महापालिकांसह अंबरनाथ आणि बदलापूर या नगरपालिका आणि एमआयडीसी, स्टेम प्राधिकरण यांना बारवी धरणातून पाणी पुरवलं जातं. (Thane News)

दरवर्षी जलसाठा कमी होत असल्यानं उपलब्ध जलसाठ्याचं योय नियोजन करण्यासाठी १५ ते २० टक्क्यांची पाणीकपात जलसंपदा विभागाकडून केली जाते. मात्र यंदाच्या वर्षी बारवी धरणात ५० टक्के जलसाठा शिल्लक आहे. पावसाळ्यापर्यंत हा जलसाठा पुरणार असल्यानं यंदा कोणतीही पाणीकपात न करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Suryakumar yadav: सूर्या मला सतत मेसेज करायचा, माझ्या मागे...; बॉलिवूड अभिनेत्रीच्या दाव्याने एकच खळबळ

SSC-HSC Exam: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! तोंडी परीक्षेबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय

Samsaptak Yog: 50 वर्षांनंतर शनी-शुक्र बनवणार समसप्तक राजयोग; या राशींना मिळणार यश आणि पैसा Saturn Venus rare conjunction

Famous Actor mother Dies: प्रसिद्ध अभिनेत्याला मातृशोक; संथाकुमारी यांचे दिर्घकालीन आजाराने निधन

Maharashtra Live News Update: आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे कारागृहातून लढवणार निवडणूक

SCROLL FOR NEXT