rayate bridge, kalyan nagar highway, Kalyan-Dombivli Rain News,  saam tv
मुंबई/पुणे

Kalyan-Dombivli Rain News : रायते पूलावर आजही पाणीच पाणी, कल्याण- नगर महामार्गावरील वाहतूक बंद

नागरिकांनी पूलावरुन धाेकादायक वाहतुक टाळावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Siddharth Latkar

- अभिजित देशमुख

Kalyan Dombivli News : गेले तीन दिवसांपासून कल्याण डोंबिवलीसह आजूबाजूच्या ग्रामीण भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. जोरदार पावसामुळे काळु नदी, उल्हास नदी दुथडी भरून वाहू लागली. याचा फटका कल्याण नगर महामार्गाला बसला आहे.(Maharashtra News)

पावसामुळे (rain) कल्याण नगर महामार्गांवरील रायते पुलावर (rayate bridge kalyan) नदीचे पाणी बुधवारी माेठ्या प्रमाणात आले. पुलावर पाणी येण्यास सुरुवात झाल्याने दुपारच्या सुमारास कल्याण नगर महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. तसेच कल्याण नगर महामार्गावरील पांजरपोळ गावाजवळील रस्त्यावर पाणी मोठ्या प्रमाणात आल्याने वाहतूक कोंडी झाली.

आज (गुरुवार) सकाळी रायते पुलावरील पाणी काही अंशी ओसरले असलं तरी पाऊस सातत्याने सुरू असल्याने आजही हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी वाहन पूलावरुन नेऊ नयेत असे आवाहन करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिमंडळ बदलाच्या हालचाली?

राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! दोन्ही राष्ट्रवादीची अचानक बैठक, कोअर कमिटीनं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नेमकं कारण काय?

Cabinet Reshuffle : राज्यातील ५ मंत्री बदलणार? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलांच्या हालचाली, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Kojagiri Purnima 2026: कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीच्या कृपेसाठी चुकवू नका ‘या’ गोष्टी

Soan Papdi Recipe: यंदा दिवाळीत घरी बनवा हलकी, खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारी सोनपापडी, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT