Pune Municipal Corporation
Pune Municipal Corporation Saam Tv
मुंबई/पुणे

पुणेकरांनो पाणी जपून वापरा! एक दिवसाआड पाणी पुरवठा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन जाधव

पुणे - पावसाने ओढ दिल्याने आणि धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने पुणेकरांवर पाणी कपातीच संकट आलं आहे. आजपासून पुणेकरांना (Pune) एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे. पुणे महापालिका आयुक्तांनी गुरुवारी पाणी पुरवठा अधिकाऱ्यांची नियोजन आढाव घेतली होती त्यात पाणी टंचाई होऊ नये, यांसाठी आतापासूनच काटकसरीने पाणी वापर करण्याच्या दृष्टीने पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले आहे.

पुणे शहरात सध्या समान पाणी पुरवठा होत नाही अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणी येत.त्यामुळे सर्व नागरिकांना समान पाणी मिळावे यांसाठी पाणी कपात आणि नियोजन गरजेच आहे त्यासाठी महापालिका प्रशासनाने एक पत्रक काढले आहे. सुरवातीला आठ दिवसासाठी हा निर्णय करण्यात आला आहे.

हे देखील पाहा -

आज ४ जुलै ते ११ जुलै २०२२ अशी पाणी कपात असणार आहे. जर धरण क्षेत्रात पाऊस झाला आणि पाणीसाठा वाढला तर परत पाणी कपातीवर निर्णय करण्यात येणार आहे. मात्र यावर सामाजिक कार्यकर्ते आणि महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, टेमघर, वरसगाव या चारही धरणात मिळून आज मिथिला २.६७ टीएमसी पाणी शिल्लक आहे. जो गेल्या वर्षी याच दिवशी ८.६८ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे राज्यसरकार महापालिका प्रशासन अन पाटबंधारे विभाग पाणी नियोजन करत नसल्याचा आरोप केला जात आहे.

‘या’ परिसरात 4, 6 व 8 जुलैला होणार पाणीपुरवठा

संतोषनगर, दत्तनगर, आंबेगाव खुर्द, वाघजाईनगर, अटल अकरा हनुमाननगर, जांभुळवाडी रोड, बालाजीनगर संपुर्ण परिसर, महादेवनगर, कात्रज संपूर्ण परिसर, कोंढवा बु. संपूर्ण परिसर, बिबवेवाडी, तळजाई, लोअर इंदिरानगर, अप्पर, पद्मावती, चव्हाणनगर, अप्पर पंपींग परिसर, खामकर वस्ती, शिवदर्शन, पर्वती दर्शन, महर्षिनगर, आदिनाथ सोसायटी, सहकारनगर, जनता वसाहत, मुळा रोड, खडकी कॅन्टोमेंट, औंध, सकाळ नगर, बाणेर, रामबाग कॉलनी, शिवाजीनगर, कोथरुड, जय भवानीनगर, किष्कींधानगर, पौड रस्ता, केळेवाडी, सुतारदरा, एमआयटी कॉलेज, शात्रीनगर, आनंद नगर, वनदेवी मंदिर, श्रमीकनगर, बावधन बु. भुसारी कॉलनी, मयुर कॉलनी, करिष्मा सोसायटी परिसर, महात्मा सोसायटी, हिंगणे होम कॉलनी, विठ्ठल मंदिर परिसर, कर्वेनगर, अहिरेगांव, धानोरी गावठाण, लोहगांव रस्ता, मुंजाबा वस्ती, खेसे पार्क, खराडी, नगर रस्ता, आपले घर, ईऑन आयटी पार्क, वडगांव शेरी, हडपसर, गोंधळेनगर, मगरपट्टा, केशवनगर, मुंढवा, रामटेकडी, लुल्लानगर, कोंढवा खु., पुणे कॅन्टोमेंट.

‘या’ परिसरात 5, 7, 9 व 11 जुलैला होणार पाणीपुरवठा

वडगाव जलकेंद्र परिसर, उंबर्‍या गणपती चौक, नांदेडफाटा, धायरी, राजस सोसायटी, वडगांव गावठाण, वडगांव बु. जयभवानी नगर, माणिकबाग, हिंगणे परिसर, तुकाईनगर, भारती विद्यापीठ परिसर, धनकवडी, वंडरसिटी, आंबेगाव पठार, सहकार नगर, आंबेगाव बु., दांडेकर पुल, नवी पेठ, दत्तवाडी, सर्व पेठा, टिळक रस्ता, स्वारगेट परिसर, जनता वसाहत, पर्वती जलकेंद्र परिसर, चतुशृंगी पाणीपुरवठा विभाग, गोखले नगर, भोसले नगर, जनवाडी, वैदुवाडी, मॉडेल कॉलनी, सेनापती बापट रस्ता परिसर, लॉ. कॉलेज रस्ता परिसर, भांडारकर रस्ता परिसर, प्रभात रस्ता परिसर, डेक्कन, जंगली महाराज रस्ता परिसर, बोपोडी, खडकी रेल्वे स्टेशन परिसर, जुना पुणे मुंबई रस्ता परिसर, बाणेर गाव, बालेवाडी, सूसरोड, बाणेर पाषाण लिंग रस्ता परिसर, सायकर मळा, सुतारवाडी परिसर, सुस गांव म्हाळुंगे, चांदणी चौक, बावधण बु. दशभुजा गणपती, नळस्टॉप, मंबई पुणे बायपास दोन्ही बाजू, वारजे, माळवाडी, वारजे जुना जकात नाका परिसर, इंगळे नगर, कळस, म्हस्के वस्ती, विश्रांतवाडी, संजय पार्क, साकोरे नगर, विमान नगर, रामवाडी, मुळीक नगर, वडगांवशेरी, टेम्पो चौक, गलांडे वस्ती, साईनगर, संपूर्ण येरवडा, संगमवाडी, आळंदी रस्ता, फुले नगर, टिंगरे नगर, नागपूर चाळ, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, वैदुवाडी, हडपसर गावठाण, सय्यद नगर, ससाणे नगर, काळेबोराटे नगर, वानवडी, आझाद नगर, बी.टी. कवडे रस्ता, घोरपडी.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Toyota Rumion कार भारतात लॉन्च, मोठ्या फॅमिलीसाठी आहे बेस्ट; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Nandurbar News | हिना गावित आणि गोवाल पाडवींमध्ये लढत

धैर्यशील मोहिते पाटील यांनी विश्वासघात केला - फडणवीस!

Lok Sabha Election: गुजरातनंतर मध्यप्रदेशातही घडला 'सूरत कांड', इंदूरमध्ये काँग्रेसचा उमेदवार फितूर; उमेदवारी घेतली मागे

Raj Thackeray: उद्धव ठाकरेंच्या सभेला राज ठाकरेंच्या सभेने प्रत्युत्तर..

SCROLL FOR NEXT