24 hour water supply cut in Thane and Bhiwandi areas SAAM TV
मुंबई/पुणे

Water Crisis : ठाणे आणि भिवंडीत पाणीबाणी! काही भागांत सलग २४ तास पाणीपुरवठा बंद

WATER CRISIS IN THANE AND BHIWANDI : ठाणे आणि भिवंडीतील काही भागांत २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Saam Tv

ठाणे आणि भिवंडी शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जलशुद्धीकरण केंद्रातील पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने ठाणे शहरातील मुंब्रा, दिवा आणि कळवा परिसरात २४ तास पाणीपुरवठा खंडित होणार आहे.

दुसरीकडे, भिवंडी शहरात तानसा जलवाहिनीवरील दुरुस्ती आणि देखभालीच्या कामांमुळे २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आधीच पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा आणि पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

ठाण्यात मुंब्रा, दिवा आणि कळव्यात पाणीबंद

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मुंब्रा, दिवा आणि कळवा प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा केला जातो. यंदा पावसाळ्यानंतर कमी पाऊस, अल निनोचा संभाव्य प्रभाव आणि ऑक्टोबर २०२६ पासून मान्सूनने लवकर माघार घेतल्यामुळे शासनाच्या निर्णयानुसार १० टक्के पाणीकपात करण्याचे ठरवण्यात आले आहे.

त्यानुसार जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा गुरुवार, १९ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून शुक्रवार, २० नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या कालावधीत मुंब्रा, दिवा आणि कळवा प्रभाग समितीतील सर्व भागांचा पाणीपुरवठा बंद राहील. मुंब्रा येथील प्रभाग क्रमांक २६ आणि ३१ मधील काही भागांना या बंदचा अपवाद असेल. पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्यानंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी मिळण्याची शक्यता आहे.

भिवंडीतही २४ तास पाणीपुरवठा बंद

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेमार्फत तानसा जलवाहिनीवरील विविध दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. वर्‍हाळदेवी मंदिराजवळ ३०० मिलिमीटर व्यासाचा नवीन व्हॉल्व बसवणे, गौतम कंपाऊंड येथील एअर व्हॉल्वची दुरुस्ती, मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरुस्ती आणि धोबीतलाव पाण्याच्या टाकीसाठी नवीन व्हॉल्व बसवण्याची कामे केली जाणार आहेत.

या कामांमुळे बुधवार, १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजल्यापासून गुरुवार, १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत भिवंडी शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यानंतर पुढील एक दिवस कमी दाबाने आणि कमी प्रमाणात पाणीपुरवठा होईल.

नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवावा

दोन्ही शहरांतील पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवावा. पिण्याचे पाणी, स्वयंपाक आणि दैनंदिन वापरासाठी पाण्याचे नियोजन करावे. पाणीपुरवठा पूर्ववत झाल्यानंतरही काही काळ कमी दाबाने पाणी मिळण्याची शक्यता असल्याने पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन संबंधित महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पैठणमधील गोदावरी नदीकाठी मच्छीमार महिलांचं जलसमाधी आंदोलन

Crime News: महिला पोलीस उपनिरीक्षकाचा बाथरूममध्ये आढळला मृतदेह; वडिलांच्या कॉलमुळे धक्कादायक प्रकार उघड

Motor Insurance Rules : १५ डिसेंबरपासून वाहनधारकांना मोठा झटका! कार-बाईक विम्याचे नियम बदलणार

Kitchen Hacks : काळाकुट्ट तवा होईल चकाचक! मीठ, लिंबू अन् बेकिंग सोड्याची ही ट्रिक एकदा वापरून पाहाच

शिवसेना अन् धनुष्यबाण कुणाचा? सुप्रीम कोर्टात व्हॉट्सॲप चॅटचा स्क्रीनशॉट; सुनावणीत खळबळ

SCROLL FOR NEXT