Silver Aok Saam TV
मुंबई/पुणे

शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचा इशारा ४ दिवसांआधीच; खळबळजनक माहिती समोर

शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या (Silver Aok) मुंबई येथील सिल्वर ओक येथील घरासमोर एसटी कर्मचाऱ्यांकडून आंदोलन करण्यात आलं होतं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक -

मुंबई : शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या मुंबई येथील सिल्वर ओक (Silver Oak) घरासमोर एसटी कर्मचाऱ्यांकडून आंदोलन करण्यात आलं होतं या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी पवारांच्या (Sharad Pawar) घरावर हल्ला देखील केला होता. मात्र या हल्लाची कल्पना आधीच पोलिसांच्या विशेष शाखेद्वारे पोलिसांना देण्यात आली होती अशी माहिती समोर आली आहे.

याबाबतच पत्र ४ एप्रिल रोजी गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर पोलिस आयुक्त राजीव जैन यांनी विश्वास नागंरे पाटलांना ( Vishwas Naganre Patil) दिली होती. अशी माहिती आता समोर आली आहे. या पत्रात सिल्वर ओक, वर्षा, मातोश्री, परिवहन मंत्र्यांचा बंगला इथे आंदोलक आंदोलन करू शकतात असा उल्लेख करण्यात आला आहे. तर पाच एप्रिल सिल्वर ओक आणि मातोश्री बंगल्यावर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. तसंच यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असाही या पत्रामध्ये उल्लेख करण्यात आला आहे.

हे देखील पाहा -

चार एप्रिल रोजी इशारा देऊनदेखील आंदोलना वेळी पोलीस उपलब्ध नव्हते. त्यामुळे पोलिसांना अलर्ट असून देखील त्यांनी खबरदारी घेतली नसल्यामुळे हा हल्ला झाल्याचं समोर येत आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Shah : 'पहलगाम हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी मारले', शाहांकडून संसदेत माहिती | VIDEO

Dream Psychology: स्वप्नात वारंवार अपघात पाहण्याचे संकेत काय?

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

Mrunal Thakur: तुझं सौंदर्य पाहून चंद्रही लाजेल...

Hidden Gems Maharashtra : भंडारदऱ्याजवळ पाहा Top 7 ठिकाणं, पावसाळ्यातलंं अद्भूत दृश्य

SCROLL FOR NEXT