Pune Walse Patil Dog Fight Snake
Pune Walse Patil Dog Fight Snake Saam TV
मुंबई/पुणे

Snake Attack : कुत्र्याने वाचविला मालकिणीचा जीव; सापाच्या तावडीतून केली सुटका, पाहा VIDEO

साम टिव्ही ब्युरो

Snake vs Dog Fight : पाळीव प्राण्यांनी संकटात सापडलेल्या मालकाचा जीव वाचवल्याच्या अनेक घटना (Social Media) आपण नेहमी ऐकतो. त्यामुळे माणसाचं पाळीव प्राण्यासोबत एक घट्ट नातं राहिलेलं आहे. कुत्रा हा अगदी प्रामाणिक प्राणी मानला जातो. मालक संकटात असल्यास कुत्रा नेहमी त्यांच्या मदतीला धावून जातो. अशीच एक घटना पुण्यातून समोर आली आहे. येथे एका कुत्र्याने सापापासून मालकिणीचा जीव वाचवला आहे. (Snake Attack Video)

पुण्यात एका मालकिणीसाठी कुत्राच देवदूत ठरला. अंगणात भलामोठा साप दिसल्यानंतर महिला प्रचंड घाबरली आणि चक्कर येऊन खाली पडली. अशावेळी हा साप महिलेकडे येणार इतक्यात पाळीव कुत्र्याने महिलेकडे धाव घेतली आणि या सापाला गेटबाहेर हुसकावून लावलं. अंगावर काटा आणणारी ही घटना (Viral Video) माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे स्वीय सहाय्यक रामदास वळसे पाटील यांच्या निरगडसर इथल्या घरी घडली. (Pune Walse Patil Dog Fight Snake)

प्राप्त माहितीनुसार, रामदास वळसे-पाटील यांच्या पत्नी चंदा वळसे-पाटील या अंगणातील गेटजवळ गेल्या असताना त्यांना तिथे एक भलामोठा साप दिसला. सापाला पाहून चंदा वळसे पाटील घाबरल्या आणि खाली पडल्या. साप चंदा यांच्यावर हल्ला करणार इतक्यातच त्यांचा पाळीव कुत्रा तिथे आला.

कुत्र्याने सापावर हल्ला करत त्याला मालकिणीपासून दूर ठेवलं. इतकंच नाही तर कुत्र्याने सापाला गेटबाहेर सुद्धा हुसकावून लावलं. अंगावर काटा आणणारी ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सापाच्या तावडीतून आपल्या मालकिणीचा जीव वाचवणाऱ्या या कुत्र्याचं नेटकरी कौतुक करत आहेत.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Heat Wave: पुण्यात उन्हाचे चटके असह्य; उष्माघाताने तहानल्या, पाण्यातून विषबाधा झाल्यानं शेळ्या आणि मेंढ्यांचा मृत्यू

Dhananjay Munde On Uddhav Thackeray | मुंडेंचा फोन ठाकरेंनी टाळला! किस्सा काय?

Kitchen Tips: स्टीलच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Shubman Gill Statement: पराभवाच्या हॅट्रिकनंतर गिल भडकला! या खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर

Today's Marathi News Live : बीड बायपास परिसरात टोळक्याची दहशत; कोट्यवधीच्या जमिनीसाठी दुसऱ्यांदा महिलांवर हल्ला

SCROLL FOR NEXT