उठ मराठ्या ऊठ! शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अवमानाप्रकरणी राऊतांचा भाजपवर हल्ला Saam Tv
मुंबई/पुणे

उठ मराठ्या ऊठ! शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अवमानाप्रकरणी राऊतांचा भाजपवर हल्ला

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीदेखील या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत यासाठी भाजपची सत्ता असलेल्या कर्नाटक सरकारवर निशाणा साधला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: कर्नाटक राज्यातील बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अवमान करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर राज्यभरात त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीदेखील या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत यासाठी भाजपची सत्ता असलेल्या कर्नाटक सरकारवर निशाणा साधला आहे. (Wake up, Marathas! Raut attacks BJP over contempt of Shivaji Maharaj statue)

हे देखील पहा -

खासदार संजय राऊतांनी ट्विटरवर या घटनेचा व्हिडिओ शेयर करत भाजपवर जोरदार टीका केली आहे. राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, "दोन दिवस आधी पंतप्रधान मोदी (PM Modi) काशी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचा जयजयकार करतात आणि भाजपचे राज्य असलेल्या कर्नाटकात (Karnataka) छत्रपतींची अशी विटंबना होते.. हे चित्र बेंगळुरू येथील आहे.. धिक्कार! धिक्कार! उठ मराठ्या ऊठ!!" असं आवाहन त्यांनी मराठा तरुणांना ट्विटच्या माध्यमातून केलं आहे.

दुसरीकडे कॉंग्रेस नेते सचिन सावंत यांनीही या घटनेबाबात भाजपला धारेवर धरत आपली भुमिका स्पष्ट करण्याचं आवाहन केलं आहे. सचिन सावंत म्हणाले की, "बंगळुरूला महाराष्ट्राचे मानबिंदू व आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची झालेली विटंबना असहनीय आहे. भाजपा मोदींची तुलना शिवरायांशी करते. चंद्रकांत पाटील महाराजांनी व्होट बँक तयार केली असे म्हणून महाराजांचा अवमान करतात. महाराष्ट्र हे कदापि सहन करणार नाही.

शिवरायांच्या नावाचा उपयोग संधीसाधू राजकारणासाठी करायचा आणि महाराजांनाच कमी लेखायचे हा भाजपाचा कट आहे. पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. कर्नाटकमधील भाजपा सरकार मराठी भाषिकांवर भयंकर अत्याचार करत आहे. भाजपनने भूमिका स्पष्ट करावी. जाहीर निषेध" असं आवाहन त्यांनी भाजपला केलं आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वाकोला पोलिसांची मोठी कारवाई, ५ वर्षांच्या मुलीचं अपहरण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Supreme Court: निवडणुका रद्द करू नाहीतर निकाल आम्ही देऊ: सर्वोच्च न्यायालय

मुलगी झाली म्हणून सासरकडून छळ; आयुष्य 'नकोसे' झाल्यानं महिलेने संपवली जीवनयात्रा

Navi Mumbai : अलिबाग, गोव्यापेक्षाही सुंदर आहे नवी मुंबईतील 'हा' समुद्रकिनारा

T20 World Cup 2026 Schedule : टी २० वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर; या दिवशी क्रिकेटचा महाकुंभमेळा होणार सुरू, रोहित शर्माकडं मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT