Wakad : डिलिव्हरी बॉयकडून महिलेचा विनयभंग Saam Tv
मुंबई/पुणे

Wakad : डिलिव्हरी बॉयकडून महिलेचा विनयभंग

स्विगी कंपनीच्या एका अज्ञात फूड डिलिव्हरी बॉय ने एका महिलेच्या नितंबावरून हात फिरवून, तिच्या गालाच चुंबन घेण्याचा प्रयत्न

गोपाल मोटघरे

पुणे : स्विगी कंपनीच्या एका अज्ञात फूड डिलिव्हरी बॉय ने एका महिलेच्या नितंबावरून हात फिरवून, तिच्या गालाच चुंबन घेण्याचा प्रयत्न केला आहे. स्विगी बॉय इथेच नाही थांबला. तर त्याने त्या महिलेला एका हाताने मिठी मारून, ए आयटम चलती क्या? असे बोलून महिलेचं विनयभंग केले आहे. काल ११ वाजेच्या दरम्यान हा धक्कादायक प्रकार सम्राट चौक या ठिकाणी घडला आहे.

हे देखील पहा-

महिलेचा विनयभंग करणाऱ्या अज्ञात स्विगी बॉय विरोधात वाकड पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, एकूणच या घटनेमुळे वाकड- हिंजवडी सारख्या आयटी परिसरांमध्ये राहणाऱ्या महिलेच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस रात्री गस्तीवर असताना देखील स्विगी बॉयने तक्रारदार महिलेचा अतिशय विकृतपणे विनयभंग करण्याचा प्रयत्न केला आहे. आता या अज्ञात स्विगी फूड डिलिव्हरी बॉयच शोध घेण्याचे मोठे आवाहन वाकड पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्ट पथकातील पोलीस उपनिरीक्षक विजय सागंडे वय ५७ यांचं निधन

मुंबईच्या ५ स्टार हॉटेलमध्ये जेवायला गेले अन् ताटात काय दिसलं? प्रसिद्ध डॉक्टरांचा थेट तुकाराम मुंढेंकडे संताप

Shocking: स्नानासाठी तलावात डुबकी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ६ मुलांचा बुडून मृत्यू

Accident : मोठी बातमी: मुंबईत भाजप आमदाराच्या कारचा भीषण अपघात, फ्री वे वर ३ वाहनांना धडक

मोठी बातमी! मिरजमध्ये सरकारी रुग्णालयाचा स्लॅब कोसळला; 6 जण ढिगाऱ्याखाली अडकले, 2 जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT